Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : परभणी, हिंगोलीत सर्वदूर ‘अवकाळी’चा तडाखा

Crop Damage : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील शनिवारी (ता. १३) सकाळी दहापर्यंतच्या २४ तासांमध्ये सर्वदूर अवकाळी पाऊस झाला.

Team Agrowon

Parbhani News : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील शनिवारी (ता. १३) सकाळी दहापर्यंतच्या २४ तासांमध्ये सर्वदूर अवकाळी पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात सरासरी १७.७ मिलिमीटर, तर हिंगोली जिल्ह्यात सरासरी ७.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली सलग पाचव्या दिवशी पाऊस सुरुच असल्यामुळे शेतात वाळवत घातलेली हळद, ज्वारी, कलिंगड, कांदा, आंबा, लिंबू आदी फळे, भाजीपाला आदी पिकांचे नुकसानीची व्याप्ती वाढली आहे.

अवकाळी पावसाच्या संकटामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यांतील सर्व मंडलांत हलका ते जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात एप्रिल महिन्यात शनिवारी (ता. १३) सकाळी दहापर्यंत एकूण सरासरी ३०.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सर्व पाच तालुक्यांतील मंडलांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात एप्रिल महिन्यात आजवर सरासरी एकूण १५.११ मिलिमीटर पाऊस झाला.

मंडलनिहाय पाऊस (१० मिलिमीटरच्या पुढे) : परभणी जिल्हा ः परभणी १९.३, पेडगाव २५.३, जांब २३.८, झरी १४.३, सिंगणापूर २२.३, दैठणा ३०.३, पिंगळी १४.५, टाकळी कुंभकर्ण २२, जिंतूर १४.८, बामणी ३२.३, बोरी १२.५, आडगाव १०.३, चारठाणा २०.५, वाघी धानोरा ११.३, दूधगाव ३०.५, सेलू २०,

वालूर ३१, कुपटा २०.५, चिकलठाणा २८.५, मोरेगाव ४१.८, ताडबोरगाव २६, रामपुरी २५, कासापुरी १५.३, आवलगाव ३१.८, शेळगाव २२.५, वडगाव १३.५, गंगाखेड २१, महातपुरी २६, माखणी १६.३, राणीसावरगाव २४, पालम १८.५, बनवस ३२, पेठशिवणी १७, रावराजूर २१.३, पूर्णा १४, लिमला १९.३, कात्नेश्वर १२.८. हिंगोली जिल्हा ः हिंगोली ११, दिग्रस कऱ्हाळे २७.३, नांदापूर १८, आंबा १०, औंढा नागनाथ १५.५, येळेगाव १२.८, साळणा १०.५, जवळा बाजार ११, साखरा १४.३, हत्ता १३.३.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maratha Youth Scheme: कर्जाचा व्याज परतावा तातडीने द्या : तांबे

Farmer Cup 2026: फार्मर कप स्पर्धेत पुतळीच्या महिला समूहाचा सहभाग

HTBT Cotton Seeds: नागपुरात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Satara Rain News: पूर्वमोसमी पावसाचा साताऱ्याला मोठा फटका

Hingoli Water Scarcity: पाणीटंचाई निवारणार्थ २८ गावांमध्ये ३६ नवीन विंधन विहिरीना मंजुरी

SCROLL FOR NEXT