Unseasonal Rain : उमरगा तालुक्यात वादळवाऱ्यासह गारपीट

Weather Update : वादळी वारा आणि गारांचा पाऊस झाल्याने ऊस, उन्हाळी तूर, कांदा पिकांसह आंब्यासह इतर फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.
Unseasonal Rain
Unseasonal RainAgrowon

Umraga News : शहर व ग्रामीण भागातील बहुतांश गाव, शिवारात गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास अवकाळी पावसाचा तडाखा बसला. वादळी वारा आणि गारांचा पाऊस झाल्याने  ऊस, उन्हाळी तूर, कांदा पिकांसह आंब्यासह इतर फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.

Unseasonal Rain
Crop Damage : अमरावती जिल्ह्यात नुकसान पोचले ५३ हजार हेक्‍टरवर

उमरगा तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली होती. यंदा पहिल्यांदाच गुरुवारी अवकाळी पाऊस झाला.   दुपारी साडेतीनपासून काही गावात सुरवात झाली होती. तालुक्यातील नारंगवाडी, बाबळसुर, नाईचाकुर, मातोळा, एकूरगा, सावळसुर, बाबळसुर, वागदरी, त्रिकोळी, कुन्हाळी, कदमापुर, तुरोरी, तलमोड, बलसुर आदी भागात पावसाने तब्बल पाऊण तास झोडपल्याने ग्रामीण भागात नागरिकांची धांदल उडाली.

Unseasonal Rain
Unseasonal Rain : मराठवाड्यातील पिकांना पाऊस, गारपिटीचा दणका

शेतशिवारातील आंब्यासह उन्हाळी तूर, कांद्यासह अन्य पिकांसह भाजीपाला, पपई, कलिंगड, हळद, व फळबागेचे मोठे नुकसान झाले. माडज शिवारातील विलास पाटील यांच्या शेतातील वादळी वाऱ्याने पत्र्याचे शेड उडाले.

सांयकाळी पुन्हा काही भागासह शहरात वादळी वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. सांयकाळी ढग भरून असल्यामुळे अधूनमधून पावसाची रिमझिम सुरूच होती. दरम्यान हिप्परगाराववाडी येथील मारुती यंपाळे यांची केसर आंब्याच्या आमराईत कैऱ्यांचा सडा पडला होता. नाईचाकुर येथील राम  पवार यांच्या केसर आंब्याचे मोठे  नुकसान झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com