Pre-Monsoon Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Pre-Monsoon Rain : वऱ्हाडात मॉन्सूनपूर्व पावसाचा तडाखा

Unseasonal Rain : मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात अधूनमधून ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा अनुभव नागरिक घेत आहेत.

Team Agrowon

Akola News : मे महिन्यात उन्हाच्या तीव्रतेला विराम देत सातत्याने मॉन्सूनपूर्व पाऊस होत आहे. रविवारी (ता. २५) अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत बऱ्याच ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. शिवाय उन्हाळी हंगामातील भुईमूग, मूग, तीळ या पिकांची काढणी करण्यात अडथळे तयार होत असून शेतकरी चिंतातूर झालेले आहेत.

मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात अधूनमधून ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा अनुभव नागरिक घेत आहेत. ९ ते १३ मे दरम्यान पातूर तालुक्यातील आठ गावांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे तब्बल २३४.३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

यात लिंबू, कांदा, आंबा, उन्हाळी मूग व उडीद या पिकांचा समावेश आहे. त्यात भर म्हणून १९ ते २२ मे दरम्यान अकोला जिल्ह्यातील सात तालुक्यांतील १५७ गावे पावसाने प्रभावित झाली असून, ९०९.३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे.

शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हवामान विभागाच्या नागपूर वेधशाळेने २८ मेपर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे या भागात ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

प्रशासनाने नागरिकांना शक्यतो घरातच राहण्याचे आणि गरज असल्यासच बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या २४ तासांत पावसाची तालुकानिहाय नोंद मिलिमीटरमध्ये ः अकोट १३.४, तेल्हारा १७.९, बालापूर ३१.७, पातुर ९.९, अकोला २०.२, बार्शी टाकळी ९.८ आणि मूर्तिजापूर ९.६ असा एकूण १६.७ मिलिमीटर पाऊस झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manoj Jarange Patil: राज्यात ५८ लाख नोंदी सापडल्या; त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, कोल्हापूर गॅझेटियर लागू करा, जरांगे पाटलांची मागणी

Assembly Elections Update: देशातील ५ राज्यांमध्ये निवडणुका वेळेआधीच होण्याची शक्यता; नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मतदानाची शक्यता!

Livestock Vaccination Campaign: कवलापूर येथे मॉन्सूनपूर्व पशुधन लसीकरण मोहिमेचा प्रारंभ

Maharashtra Monsoon Session 2026: पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून, कामकाज ३ आठवडे चालणार

Organic Fertilizer: शेतीचे नुकसान टाळण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवा : सुधीर शिंदे

SCROLL FOR NEXT