Nutrient Management: शेती आणि मातीचे आरोग्य जपले तरच शेतीचे भविष्य सुरक्षित राहील. शेतीचे नुकसान टाळण्यासाठी पिकांना सेंद्रिय खतांचा वापर वाढवावा. एकात्मिक पोषण व्यवस्थापनाद्वारे शेतीतील निविष्ठांचा योग्य वापर करून जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा. तसेच माती परीक्षणालाही प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे यांनी केले..अकोळनेर (ता. अहिल्यानगर) येथे ‘खेत बचाव अभियान’ अंतर्गत आयोजित शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई भोर, सिद्धांत गायकवाड, निळू ढेरंगे, कृषी विस्तार अधिकारी शिंदे, भाऊसाहेब भोर, पठाण, बन्सीभाऊ शिंदे, रघुनाथ शेळके यांच्यासह प्रगतशील शेतकरी, कृषी विभागाचे अधिकारी आणि कृषी तज्ज्ञ उपस्थित होते..Illegal Organic Fertilizer: वेंगुर्ल्यात विनापरवाना सेंद्रिय खतावर भरारी पथकाची कारवाई.श्री. शिंदे म्हणाले, की शासनाच्या ‘खेत बचाव अभियान’मुळे शेतकऱ्यांना सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीकडे वळण्याची प्रेरणा मिळत आहे. जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि रासायनिक खतांचा अतिवापर टाळण्यासाठी व्यापक जनजागृती केली जात आहे. उत्पादनवाढीसोबतच जमिनीचा कस टिकवून ठेवणे आवश्यक आहे. .Organic Fertilizer: कचऱ्यातून परतणारी माती.त्यासाठी माती परीक्षण करून पिकांच्या गरजेनुसार खतांचा संतुलित वापर करावा. रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर वाढवावा आणि नैसर्गिक शेती पद्धतींचा अवलंब करावा..एकात्मिक पोषण व्यवस्थापन (आयएनएम) अंतर्गत शेतीतील निविष्ठांचा योग्य वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी प्रगतशील शेतकरी सुनील जाधव यांच्या शेतातील ‘स्लरी फिल्टर’ची उपयुक्तता तसेच विविध सेंद्रिय खतांच्या वापराबाबत शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारंग दुगम यांनी केले, तर कांबळे यांनी आभार मानले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.