Mango Pest Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Pest : आंबा मोहरावर भुरी, तुडतुड्याचा प्रादुर्भाव

Mango Crop Protection : डिसेंबरअखेरीस मोहर आल्यानंतर ९० ते ११० दिवसांत फळे तयार होतात. यंदा साडेतीन ते चार हजार टन आंबा उत्पादन होईल, अशी अपेक्षा होती.

Team Agrowon

Raigad News : बिगर हंगामी आलेली पालवी व मोहरामुळे तालुक्यात मध्यंतरी आंबा फळगळतीला सुरुवात झाली होती. आता दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने उर्वरित मोहरावर भुरी, तुडतुड्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

डिसेंबरअखेरीस मोहर आल्यानंतर ९० ते ११० दिवसांत फळे तयार होतात. यंदा साडेतीन ते चार हजार टन आंबा उत्पादन होईल, अशी अपेक्षा होती. पण काही दिवसांपूर्वी आलेली बिगर हंगामी पालवी व मोहर यामुळे फळगळतीला सुरुवात झाली. त्‍यात ढगाळ वातावरणामुळे बागायतदार काळजीत आहेत.

औषध फवारणीचा सल्‍ला

तळा : कोकण विभागामध्ये दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. हे वातावरण कीड व रोग प्रादुर्भावासाठी अनुकूल असल्‍याने आंबा पिकावर फुलकिडी व फळमाशी, करपा रोगाचा प्रादुर्भाव तसेच काजू पिकावर ढेकण्या आणि फुलकिडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

यामुळे आंबा व काजू बागेची नियमित पाहणी करून कीड व रोगनिहाय औषध फवारणी करावी, असा सल्‍ला तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे यांनी दिला आहे.

श्रीवर्धनमध्ये यंदा ९० टक्के हापूस आंब्याची लागवड आहे. ढगाळ वातावरणामुळे भुरी, तुडतुड्या रोगांचा प्रादुर्भाव होतो. याला आळा घालण्यासाठी कीटकनाशक, बुरशीनाशकांची वेळीच फवारणी करणे आवश्यक आहे.
- श्रद्धा किरण डुंबरे, कृषी अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT