Mango Orchard
Mango Orchard Agrowon

Mango Pest : फुलकिडी नियंत्रणासाठी आठ आंबा बागांची निवड

Mango Orchard : कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या अध्यक्षतेखाली मागील वर्षी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांबरोबर झालेल्या बैठकीत फुलकिडीवरील नियंत्रणाविषयी प्रत्यक्ष बागेत जाऊन संशोधन करण्याचा निर्णय घेतला होता.
Published on

Ratnagiri News : गेली काही वर्षे हापूसवर होणाऱ्या फुलकिडींवर (थ्रीप्स) नियंत्रण ठेवण्यासाठी कृषी विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आंबा पिकावरील फुलकीड नियंत्रण पथदर्शी कार्यक्रमांतर्गत दुसऱ्या वर्षी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील प्रत्येकी चार गावांमधील आंबा बागांमध्ये प्रयोग केला जाणार आहे. मागील वर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील दोन बागांमधीळ थ्रीप्सवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवण्यात यश आले होते, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी दिली.

कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या अध्यक्षतेखाली मागील वर्षी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांबरोबर झालेल्या बैठकीत फुलकिडीवरील नियंत्रणाविषयी प्रत्यक्ष बागेत जाऊन संशोधन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील प्रत्येकी दोन गावे निवडण्यात आली होती. गतवर्षी काही प्रमाणात यश मिळाल्यामुळे यंदा बागांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Mango Orchard
Mango Blossom : प्रतिकूल हवामानामुळे यंदा आंबा मोहोर दोन-तीन टप्प्यांत

कोकण कृषी विद्यापीठात नुकत्याच झालेल्या आंबा टास्क फोर्सच्या बैठकीत यावर चर्चाही झाली. त्यामध्ये दोन्ही जिल्ह्यांतील आठ गावांमधील बागांमध्ये थ्रीप्स नियंत्रणावर प्रयोग केला जाणार आहे. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील कळंबट (दापोली), गोळप, नागलेवाडी (रत्नागिरी) आणि पालशेत (गुहागर) येथील शेतकऱ्यांच्या बागा आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आचरा, देवली (मालवण), फणसे, खुडी (देवगड) या चार बागा घेण्यात आल्या आहेत.

यामध्ये कृषी विभागाकडून आवश्यक कीटकनाशक, खते किंवा लागणारे अन्य साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. तर कृषी विद्यापीठाचे संशोधक कीटकनाशक फवारणीच्या वेळापत्रकासह त्यामध्ये होणारे बदल यावर लक्ष ठेवणार आहेत.

Mango Orchard
Mango Crop Insurance : कोकण सोडून इतर भागांतील आंबा पिकासाठी विमा योजना

पुढील आठ दिवसांमध्ये हा प्रकल्प प्रत्यक्षात कार्यान्वित होईल, असे सांगण्यात आले. विद्यापीठाकडून कीटकशास्त्र विभागाचे संशोधक संचालक व्ही. एन. जालगावकर यांच्याकडे जबाबदारी दिली गेली आहे. प्रयोगासाठी निवडलेल्या आंबा प्रक्षेत्राला कृती दलामार्फत भेट देण्यात आली आहे.

पाच वेळा केली कीटकनाशक फवारणी

गतवर्षी चार बागांमध्ये फुलकिडी नियंत्रणासाठी प्रत्येकी पाच वेळा कीटकनाशक फवारणी करण्यात आलेली होती. विद्यापीठाने त्याचे वेळापत्रक तयार करून दिले होते. तसेच विद्यापीठाचे संशोधक त्या बागांची पाहणी करीत होते. त्यामुळे काही प्रमाणात नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com