paddy in Punjab Agrowon
ॲग्रो विशेष

Purchase of paddy in Punjab : केंद्र सरकार पंजाबमधील धान खरेदीनंतर लगेच देणार पेमेंट; शेतकऱ्यांच्या रोषाला कमी करण्याचे प्रयत्न

Central Government Purchase of paddy in Punjab : पंजाबमध्ये धान खेरदीतील दिरंगाईवरून धान उत्पादक शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. यावरून संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वात आंदोलन देखील करण्यात आले आहे. यानंतर आता केंद्र सरकारने यात लक्ष घातले आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : पंजाबमध्ये हमीभावावर धानाची खरेदी केली जात आहे. पण येथे धान खरेदीत सुरू असलेल्या दिरंगाईवरून धान उत्पादक शेतकऱ्यांसह शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. यावरूनच संयुक्त किसान मोर्चाने (SKM) पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या घराला घेराव घालण्याचा इशारा दिला. यानंतर आता हमीभावावर धानाची खरेदी केल्याबरोबर त्वरित पेमेंट केले जाईल, अशी माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे. त्यांनी याबाबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची भेट घेतली. यावेळी सविस्तर चर्चा केल्यानंतर केंद्रीय मंत्री जोशी यांनी ही माहिती दिली.

खरीप हंगाम २०२४-२५ अंतर्गत धान खरेदीची प्रक्रिया पंजाबमध्ये सुरू झाली आहे. येथे धान खरेदी १ ऑक्टोबरपासून सुरू झाली असून ती ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत चालेल. मात्र महिन्याचे पंधरा दिवस ओलंडूनही यावरून धान उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याचमुद्द्यावर शेतकऱ्यांनी चक्का जाम करत निषेध देखील केला होता. तर आता किसान मोर्चाने (SKM) पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या घराला घेराव घालण्याचा इशारा दिला आहे.

यादरम्यान पंजाबमध्ये उद्भवलेल्या धान खरेदीतील समस्यांकडे केंद्र सरकारने लक्ष घातले आहे. तर हमीभावावर धानाची खरेदी केल्याबरोबर त्वरित पेमेंट केले जाईल असा दावा केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे. तसेच धानाची खरेदीसह साठवणूक करण्यासाठी ठोस तयारी केल्याचा दावा देखील केंद्रीय मंत्री जोशी यांनी यावेळी केलाय.

यावेळी केंद्रीय मंत्री जोशी यांनी, गेल्या खरीप हंगामातील १२४.१४ लाख मेट्रिक टन तांदूळ खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. या वर्षी १८५ लाख टन धान खरेदीचा अंदाज आहे. ज्याला केंद्र सरकारने मान्यता दिली असून खरेदीवर कोणतेही बंधन नसेल, असे म्हटले आहे.

यंदा पंजाबमध्ये २२०० हून अधिक मंडईंमध्ये धान खरेदी सुरू असून १३ ऑक्टोबरपर्यंत एकूण ७ लाख टन धानाची आवक झाली. त्यापैकी सुमारे ६ लाख टन धानाची खरेदी झाली आहे. सरकारने कस्टम मिल्ड राइस (CMR) साठवण्यासाठी डिसेंबर २०२४ पर्यंत ४० लाख टन साठवण क्षमता तयार केली आहे. त्याअंतर्गत जुना तांदूळ आणि गव्हाचा साठा आधी रिकामा केला जात असल्याची माहिती केंद्रीय मंत्री जोशी यांनी दिली आहे.

तसेच केंद्रीय मंत्री जोशी यांनी, केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन नोंदणी, जमिनीच्या नोंदी एकत्र करणे आणि डिजिटल खरेदी ऑपरेशन्ससह अनेक डिजिटल व्यवस्था निर्माण केल्या आहेत. किमान आधारभूत किंमत (MSP) शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात दिली जाईल. हे पेमेंट साधारणत: ४८ तासांच्या आत देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर ही व्यवस्था शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या गैरसोयीला तोंड द्यावे लागू नये म्हणून केल्याचंही केंद्रीय मंत्री जोशी यांनी म्हटले आहे.

याचबरोबर या बैठकीत धान आणि तांदळाचे आऊट टर्न रेशो (ओटीआर) आणि कमिशन दरांचा आढावा घेण्यात आला. कमिशन फीमध्ये देखील सुधारणा करण्याचा विचार केला जात असून यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही आश्वासन केंद्रीय मंत्री जोशी यांनी दिले. याचवेळी धान खरेदीशी संबंधित वाहतूक खर्च आणि गिरणी मालकांकडून होणारे अतिरिक्त शुल्कावर चर्चा करण्यात आली. यावर देखील सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन सरकारकडून केंद्रीय मंत्री जोशी यांनी दिलेआहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT