Purchase of paddy in Punjab : धान खरेदीतील अडचणीप्रकरणी एसकेएम आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घालणार घेराव

Samyukt Kisan Morcha : पंजाबमधील धान उत्पादक शेतकरी सरकारच्या विरोधात चांगेलच आक्रमक झाले आहेत. आता शेतकऱ्यांनी धान खरेदीतील अडचणींमुळे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्यासह काळे झेंडे दाखवण्याची तयारी केली आहे.
paddy in Punjab
paddy in PunjabAgrowon
Published on
Updated on

Pune News : पंजाबमध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांचा रोष आता वाढताना दिसत आहे. येथे धान खरेदीतील मंद गतीचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याने संयुक्त किसान मोर्चा (SKM) आता आक्रमक झाला आहे. तर शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासह धान खरेदीला गती देण्यासाठी प्रयत्न सरकार करत नसल्याचा आरोप एसकेएमने केला आहे. तसेच सरकारच्या या दिरंगाईविरोधात शेतकरी, कमिशन एजंट आणि राईस मिल मालक मोठ्या संख्येने एकत्र येणार असून १८ ऑक्टोंबरला मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या घराला घेराव घालणार आहेत. मान यांच्या घराबाहेर आंदोलन करणार आहेत.

पंजाबमधील धान खरेदीतील दिरंगाई आणि इतर समस्यांमुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. धान उत्पादक शेतकरी, कमिशन एजंट आणि राईस मिल मालक यांनी सरकारच्या या धोरणाविरोधात आता आवाज उठवला आहे. १८ ऑक्टोंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सरकारचा निषेध नोंदवणार असून घराला घेराव घालतील. त्याचबरोबर आमदार आणि मंत्र्यांना देखील काळे झेंडे दाखवण्याचे नियोजन केल्याची माहिती संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी सोमवारी (ता.१४) दिली.

paddy in Punjab
Paddy Farmers : धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्‍टरी २५ हजार रुपये बोनस मिळवून देऊ, फडणवीसांची ग्वाही

सरकारच्या धोरणाविरोधात शेतकरी संघटना, व्यापारी-कामगार संघटना आणि राईस मिलर्स यांच्या सहभागाने आंदोलन केले जावे असा निर्णय सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत पंजाबमधील धान खरेदीतील 'मंदगती'चा मुद्दा चर्चेत अग्रभागी राहिला. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी व धान खरेदीला गती देण्यासाठी प्रयत्न केले जात नसल्याचा आरोप धान उत्पादक शेतकऱ्यांसह शेतकरी संघटनांनी यावेळी केला. एसकेएमच्या नेत्यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न आणि धान खरेदीतील वेळकाढू पणावर निर्णय झाल्याशिवाय मागे न हटण्याचा निर्धार केला आहे. यापूर्वी गेल्या रविवारी राज्यस्तरीय चक्का जाम करण्यात आला होता.

paddy in Punjab
Paddy In Panjab : धान खरेदीप्रश्नी पंजाबमधील शेतकरी संतप्त; पुन्हा आंदोलन करण्याचा निर्धार, दुपारी करणार चक्का जाम

पीटीआयच्या वृत्तानुसार, शेतकरी नेते बलबीर सिंग राजेवाल म्हणाले की, पंजाबमध्ये धानाचे पीक मुबलक प्रमाणात घेतले गेले आहे. खरेदीअभावी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. १ ऑक्टोबरपर्यंत धान खरेदी सुरू व्हायला हवी होती. मात्र ती अद्यापही सुरू झालेली नाही. शेतकऱ्यांना बाजारपेठेत अडचणी येत आहेत. याला राज्यातील आप आणि केंद्र सरकारला जबाबदार असल्याचे राजेवाल म्हणाले.

शेतकऱ्यांच्या अडचणी आमदार आणि मंत्र्यांना कशा कळत नाही? त्यांना या अडचणींचे आकलन करून देण्यासाठी आमदार आणि मंत्री जेव्हा-जेव्हा धान्य बाजार पेठेत येतील तेव्हा शेतकरी त्यांना घेराव घालतील. या लोकांना काळे झेंडे दाखवतील, असेही राजेवाल म्हणाले. सरकारला जागे करण्यासाठी आम्ही एसकेएमच्या नेतृत्वाखाली गेल्या रविवारी पंजाबमध्ये ३ तास ​​रास्ता रोको केला होता. मात्र तरीही सरकार झोपेचे सोंग घेत असल्याचेही राजेवाल म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com