Satara News : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ७५ वी वार्षिक साधारण सभा उत्साहात झाली. या वेळी बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील, बँकेचे संचालक सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, उपाध्यक्ष अनिल देसाई व इतर संचालक उपस्थित होते. .बँकेचे अध्यक्ष श्री. पाटील म्हणाले, ‘‘बँकेच्या एकूणच देदीप्यमान प्रगतीमध्ये बँक स्थापनेपासून नफ्यात असून, बँकेस सतत ऑडिट वर्ग ‘अ’, प्राप्त झाला आहे. बँकेचे निव्वळ एनपीएचे प्रमाण सलग १८ वर्ष ‘शून्य’ टक्के आहे. .बँकेची वसुलीची टक्केवारी कायमच ९५ टक्केहून अधिक राहिलेली आहे. बँकेस नाबार्ड, केंद्र व राज्य शासन, तसेच सहकारी बँकिंग क्षेत्रातील नामांकित संस्थांकडून आजअखेर विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून, याचे सर्व श्रेय बँकेच्या सभासद व ग्राहकांना जाते.’’.Satara DCC Bank : सातारा जिल्हा बँकेचा तब्बल १२५ कोटींचा निव्वळ नफा, एनपीए शून्यावर!.बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी वार्षिक साधारण सभेच्या विषयांचे वाचन केले. सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. विकास संस्थांचे सभासदांनी विविध कर्ज योजना व कामकाजाचे अनुषंगाने असलेल्या अडीअडचणी संबंधी प्रश्न मांडले, तसेच काही सूचनाही केल्या. .दरम्यान, बँकेचे संचालक शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सार्वजनिक बांधकाममंत्रिपदी निवड झाल्याबद्दल संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी श्री. भोसले म्हणाले, ‘‘बँकेच्या वाटचालीमध्ये माजी आजी संचालकांचे फार मोठे योगदान आहे. बँकेत कोणत्याही प्रकारचे राजकारण आणले जात नाही. या पदाच्या माध्यमातून बँकेचे काही प्रश्न शासन स्तरावर प्रलंबित आहेत ते सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे.’’.Satara DCC Bank : सातारा जिल्हा बँकेला ‘सर्वोत्कृष्ट बँक’ पुरस्कार.रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, ‘‘जिल्हा मध्यवर्ती बँकेस आर्थिक शिस्त चांगली आहे. संचालक मंडळाची ध्येय, धोरणे व प्रशासकीय बँकेचे कामकाज चांगले आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये तीव्र स्पर्धा असून, नवीन बदल घडत आहेत..’’ या वेळी बँकेचे संचालक बाळासाहेब पाटील, प्रभाकर घार्गे, दत्तानाना ढमाळ, राजेंद्र राजपुरे, शिवरूपराजे खर्डेकर, प्रदीप विधाते, सुनील खत्री, ज्ञानदेव रांजणे, रामराव लेंभे, सुरेश सावंत, लहुराज जाधव, कांचन साळुंखे, ऋतुजा पाटील, संग्रामसिंह जाधव, जितेंद्र चौधरी व इतर मान्यवर उपस्थित होते. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.