PM Modi Punjab Rally : पंतप्रधान मोदींच्या सभेपूर्वी गुरुदासपूरमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन; पोलीसांकडून धरपकड

Farmers' Protest PM Modi Punjab Rally : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभा झाल्या. यादरम्यान शेतकरी संघटनांकडून अनेक ठिकाणी संताप व्यक्त करताना आंदोलने करण्यात आली.
PM Modi Punjab Rally : पंतप्रधान मोदींच्या सभेपूर्वी गुरुदासपूरमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन; पोलीसांकडून धरपकड

Pune News : सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून अनेक ठिकाणी प्रचाराचा धुरळा उडत आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पंजाबमध्ये शुक्रवारी (ता.२४) पोहचे. येथे गुरुदासपूर आणि जालंधरमध्ये त्यांच्या प्रचारसभा झाल्या. याआधी मात्र काही ठिकाणी आंदोकल शेतकऱ्यांनी निषेध करत आंदोलन केले. यावरून अनेक शेतकऱ्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले. तर दीनानगर येथील सभेकडे जाणाऱ्या आंदोलक शेतकरी नेत्यांसह महिलांना शहरातील बाबरी बायपास जवळ निमलष्करी दलाने अडवले. यामुळे आंदोलक शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला.

गेल्या १०० दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी एमएसपीच्या कायद्यासह प्रमुख १२ मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. ते तेथील शंभू, टिकरी आणि लखीमपूर बोर्डरवर आंदोलनावर बसले आहेत. तसेच तीन शेतकऱ्यांच्या सुटकेची मागणीही लावून धरताना केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या अटकेची मागणी केली आहे. मात्र या मागण्या अद्याप पुर्ण झालेल्या नाहीत. यावरून आंदोलक शेतकरी आणि नेत्यांनी भाजपच्या नेत्यांना प्रश्न करण्याचा निर्धार केला होता. तसेच गुरुदासपूर आणि जालंधरमधील पंतप्रधान मोदी यांच्या सभेत जाऊन प्रश्न विचारणार असल्याचे आधीच घोषित केले होते. यानंतर पोलिस प्रशासन अलर्ट झाले होते.

PM Modi Punjab Rally : पंतप्रधान मोदींच्या सभेपूर्वी गुरुदासपूरमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन; पोलीसांकडून धरपकड
PM Narendra Modi : 'माझा पूर्ण फोकस शेतकरी, तरूण, महिला आणि गरीबाच्या सक्षमीकरणावर' : मोदी

भारतीय जनता पक्षाकडून दीनानगर येथील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवाराच्यासाठी पंतप्रधान मोदी रॅलीत पोहोचले होते. मात्र याच्याआधी येथील बाबरी बायपास जवळ शेतकऱ्यांनी मोदी यांच्या विरोधात निदर्शने केली. यावरून पोलिसांनी शेतकऱ्यांना अटक केली.

तसेच केंद्रीय किसान मोर्चा आणि पंजाब किसान युनियनचे नेते मंगलसिंग धरमकोट यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा एक गट ट्रेनने दीनानगरला जात होता. जो मोदींच्या सभेत जाऊन त्यांना प्रश्न विचारणार होता. मात्र गुरुदासपूर पोलिसांनी यांना गुरुदासपूर रेल्वे स्थानकावरच ताब्यात घेतले. यावरून रेल्वे स्थानकावरच शेतकरी नेत्यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले.

PM Modi Punjab Rally : पंतप्रधान मोदींच्या सभेपूर्वी गुरुदासपूरमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन; पोलीसांकडून धरपकड
PM Narendra Modi : शेतकऱ्यांचा आशीर्वाद मागण्यासाठी आलेल्या मोदींचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीकडे कानाडोळा

यावरून डॉ.सतनामसिंग अजनाला व बलबीर सिंग मुधळ म्हणाले की, सरकारच्या जनविरोधी धोरणामुळे शेतकरी, मजुरांसह देशातील प्रत्येक घटक त्रस्त झाला आहे. याचा फटका भाजपला बसेल. याआधी दिल्लीचे आंदोलन मागे घेण्यासाठी विनंती करताना सरकारने, प्रत्येक पिकाला किमान आधारभूत किंमत देऊ, शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची समिती स्थापन करू, लखीमपूर खेरीतील हुतात्म्यांना न्याय मिळवून देऊ अशी आश्वासने दिली होती. मात्र यातील एकाही आश्वासनाची पूर्तता राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी केलेली नाही. याच्या निषेधार्थ मोदींना 'गो बॅक'चा नारा देण्यात आला होता. याप्रमाणे आम्ही दीनानगरला मोदींच्या प्रचारसभेत जाणार होतो. मात्र मात्र पोलिसांनी पक्षाला ताब्यात घेतले.

मोदी यांच्या जालंधर येथील दौऱ्यापूर्वी शेतकरी संघटनांनी अहलोवाल गावाजवळ निदर्शने केली. यावेळी जालंधर ग्रामीणचे एसपी मनप्रीत सिंह धिल्लन यांच्यासह प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात होता. मात्र शेतकऱ्यांनी भाजपचा निषेध करताना पंतप्रधानांच्या विरोधात निषेध मोर्चा काढला. यावेळी शेतकऱ्यांनी येथील जालंधर महामार्ग रोखून धरला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com