Farmer Leader  Agrowon
ॲग्रो विशेष

Shivraj Singh Chouhan Meet SKM: केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची आंदोलक शेतकरी नेत्यांशी आज बैठक

Farmers Protest : हमीभाव कायद्यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी १३ फेब्रुवारी २०२४ पासून शंभू आणि खनौरी सीमेवर आंदोलन करत आहेत. तर २६ नोव्हेंबरपासून संयुक्त किसान मोर्चाचे नेते जगजितसिंग डल्लेवाल यांचं आमरण उपोषण सुरू आहे. त्यामुळे या बैठकीत शेतकरी सरकारवर दबाव टाकण्याची शक्यता आहे.

Dhananjay Sanap

Farmers Dialogue : केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान आणि पंजाब आणि हरियाणाच्या सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी नेते यांच्यात आज (ता.२२) बैठक होणार आहे. या बैठकीत शेतकरी नेते सर्व पिकांसाठी हमीभाव कायद्याची ग्यारंटीसह विविध मागण्या करणार आहेत. त्यामुळे या बैठकीत काही तोडगा निघतो का याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

हमीभाव कायद्यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी १३ फेब्रुवारी २०२४ पासून शंभू आणि खनौरी सीमेवर आंदोलन करत आहेत. तर २६ नोव्हेंबरपासून संयुक्त किसान मोर्चाचे नेते जगजितसिंग डल्लेवाल यांचं आमरण उपोषण सुरू आहे. त्यामुळे या बैठकीत शेतकरी सरकारवर दबाव टाकण्याची शक्यता आहे.

यापूर्वी १४ फेब्रुवारी रोजी आंदोलक शेतकरी आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासोबत शेतकऱ्यांची बैठकी झाली होती. परंतु या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही.

केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी होणाऱ्या बैठकीपूर्वी शेतकरी नेत्यांची शुक्रवारी संध्याकाळी बैठक झाली. केंद्र सरकारने हमीभाव कायद्याच्या ग्यारंटीचं दिलेलं आश्वासन पूर्ण केलं तर आंदोलन थांबण्यात येणार आहे, अशी भूमिका घेतली आहे.

तसेच खनौरी सीमेवर पोलिसांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या तरुण शेतकरी शुभकरण सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यासाठी सोनीपत धान्य बाजारात शेतकरी एकत्र जमा झाले होते. यावेळी शेतकरी नेत्यांनी डल्लेवाल यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्यापूर्वी हमीभाव कायद्याच्या ग्यारंटीचं आश्वासन दिलं होतं. परंतु आता मात्र मोदी माघार घेत आहेत. त्यामुळे आमची मागणी जोवर पूर्ण होत नाही, तोवर आमचा संघर्ष सुरूच राहणार आहे, असंही शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केलं.

केंद्रीय कृषिमंत्री आणि शेतकरी नेते यांच्या पहिलीच बैठक आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत केंद्र सरकार शेतकरी नेत्यांशी चर्चा करून तोडगा काढेल का याकडे लक्ष लागून आहे.

दरम्यान, मागील गेल्यावर्षभर शेतकरी आंदोलन करत आहेत. परंतु तब्बल वर्षभरानंतर केंद्र सरकारने शेतकऱ्यांसोबत चर्चा सुरू केली आहे. यापूर्वी केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी संवाद न करण्याची भूमिका घेतली होती. तसेच पोलिस बळाचा वापर करून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु तरिही शेतकरी आंदोलक आंदोलन करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

Fertilizer Shop License Suspension: अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Pre Kharif Planning Meeting: कणेरी येथे खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक

Agrowon Podcast: बाजरीची आवक स्थिर; सोयाबीन भावात वाढ, कापसाचे दर टिकून, गव्हावर दबाव तर तुरीचे दर स्थिर

SCROLL FOR NEXT