Shetkari Sangh Meeting : शेतकरी संघाची पहिलीच बैठक लांबणीव

Agriculture News : शेतकरी संघाला ऊर्जितावस्था देणार म्हणून सर्वपक्षीय नेते एकत्र आले. संघात एकतर्फी आणि बहुमताने सत्ताही काबीज केली.
Shetkari Sangh Kolhapur
Shetkari Sangh Kolhapuragrowon
Published on
Updated on

Kolhapur News : शेतकरी संघाला ऊर्जितावस्था देणार म्हणून सर्वपक्षीय नेते एकत्र आले. संघात एकतर्फी आणि बहुमताने सत्ताही काबीज केली. मात्र, काही संचालक बाहेरगावी गेले आहत, कोणी आजारी आहेत, तर कोणाला वेळ मिळत नसल्याचे कारण सांगून शनिवारी (ता. १७) होणारी संचालक मंडळाची पहिलीच बैठक शुक्रवारी (ता.२३) घ्यावी लागणार आहे.

शेतकरी सहकारी संघाचा तोटा भरून काढून संघाला ऊर्जितावस्था देण्याची घोषणा करत सर्वपक्षीय नेत्यांनी संघाच्या निवडणुकीत मोट बांधली. पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे, आमदार पी. एन. पाटील, खासदार धनंजय महाडीक, आमदार अमल महाडीक, माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह इतर पक्षांच्या नेत्यांनी संघाच्या पॅनेलमध्ये आपापले प्रतिनिधी दिले.

Shetkari Sangh Kolhapur
Kolhapur Shetkari Sangh : कर्जात बुडालेला संघ वाचणार का?, संभासदांनी नेत्यांना दिल्या कानपिचक्या

संघासाठी भरगच्च पॅनेल बांधणी केली. या पॅनेलपुढे विरोधकांचा टिकाव लागला नाही. सर्वपक्षीय नेत्यांच्या पाठबळामुळे संघाला निश्‍चितपणे ऊर्जितावस्था येईल, या आशेने सभासदांनीही या पॅनेलला भरघोस मतांनी विजयी केले. मात्र, नूतन संचालकांच्या पहिल्या बोर्ड मिटिंगला अजूनही मुहूर्त लागलेला दिसत नाही. शनिवारी (ता. १७) होणारी पहिली बैठक विविध कारणांमुळे पुढे ढकलण्याची वेळ संचालकांवर आली आहे.

Shetkari Sangh Kolhapur
Shetkari Sangh Election : शेतकरी संघाचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे तर उपाध्यक्ष भाजपकडे, पुन्हा मंत्री मुश्रीफांचा वरचष्मा

संचालकांना पहिल्याच बैठकीला वेळ मिळत नसेल तर पुढचा कारभार कसा असेल, असा अंदाज सभासदांकडून बांधला जात आहे. संघाच्या अध्यक्ष निवडीवेळी अनेक संचालकांनी संघाच्या हिताची भाषणे केली. अध्यक्षांनीही संघाला गतवैभव मिळवून देण्यासाठी योग्य नियोजन करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे संघाचा भविष्यातला कारभार चांगला आणि संघाला ऊर्जितावस्था देण्याच्या दृष्टीने होईल, अशी अपेक्षा बाळगली होती. त्यामुळे पहिली बैठक वेळेत नसली तरी होणाऱ्या बैठकीत कोणते निर्णय घेतले जाणार, याकडे लक्ष लागले आहे.

१० लाख अद्याप जमा नाहीत

संघाच्या नूतन संचालकांनी सात टक्के व्याजदराने संघाकडे प्रत्येकी दहा लाख रुपये ठेव ठेवण्याची जबाबदारी नेत्यांनी घेतली आहे. ही रक्कम अद्याप जमा झालेली नाही. ही रक्कम जमा झाल्यास संघाच्या कारभाराला थोडा हातभार लागण्यास मदत होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com