Edible Oil  Agrowon
ॲग्रो विशेष

Edible Oil Adulteration: खाद्यतेल भेसळप्रकरणी दोन अधिकारी निलंबित

FDA Suspension: नंदुरबार जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या तपासणीत काही खाद्यतेल नमुने अयोग्य दर्जाचे आढळून आले असून, या प्रकरणी नाशिक विभागातील सहायक आयुक्त व सहआयुक्त अशा दोन दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

बाळासाहेब पाटील

Mumbai News: नंदुरबार जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या तपासणीत काही खाद्यतेल नमुने अयोग्य दर्जाचे आढळून आले असून, या प्रकरणी नाशिक विभागातील सहायक आयुक्त व सहआयुक्त अशा दोन दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच संबंधित तेल कंपनी बंद करण्याची कार्यवाही केली जाईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सोमवारी (ता. ७) विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

अन्न व औषध विभागाच्या विविध प्रश्नांवर सदस्यांनी प्रश्नांचा भडिमार करत अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले. त्यानंतर या अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी केली. यावर विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी या गतीने निलंबन करत गेलो तर त्यांचे खाते रिकामी होईल, अशी टिप्पणी केली.

अक्कलकुवा येथील बाजारपेठेत भेसळयुक्त तेलाची विक्री होत असल्याचा मुद्दा आमदार आमशा पाडवी यांनी उपस्थित केला. महेश तंवर आणि रमेश तंवर यांनी विविध कंपनीचे बनावट लेबल तयार करून पॅकेजिंग करून भेसळयुक्त तेलाची विक्री केल्याचा मुद्दा मांडला. यावर झिरवाळ यांनी अधिकाऱ्यांकडून तक्रारीनंतरही दुर्लक्ष झाल्याचे मान्य करत दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निलंबन करत असल्याचे जाहीर केले.

मंत्री झिरवाळ म्हणाले, ‘‘१० मार्च २०२५ रोजी अक्कलकुवा येथील मे. गोपाल प्रोव्हिजन या आस्थापनाची तपासणी करताना महिका ब्रँडचे रिफाईन्ड सोयाबीन तेल व कमला ब्रँडचे शेंगदाणा तेल या अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले होते. प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार हे नमुने अन्न सुरक्षा मानकांनुसार अप्रमाणित आढळले.

विक्रेत्याने अपील केल्यामुळे नमुने फेरविश्लेषणासाठी सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, मैसूर येथे पाठविण्यात आले आहेत. २०२४-२५ या कालावधीत नंदुरबार जिल्ह्यात खाद्यतेलाचे १२ नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी ५ नमुने अयोग्य दर्जाचे घोषित करण्यात आले आहेत.

त्यातील २ प्रकरणांमध्ये अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत कारवाई सुरू असून उर्वरित ३ नमुने रेफरल प्रयोगशाळेकडून तपासणी अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, ज्यावेळी छापा मारून नमुने अप्रमाणित आहेत असे लक्षात आल्यानंतरही दुर्लक्ष केले. त्यामुळे नाशिक विभागातील सहायक आयुक्त, सहआयुक्तांना निलंबित करण्यात येत आहे.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lek Ladki Yojana: ‘लेक लाडकी’च्या १२५०० लाभार्थी

Farmer Innovation: शेतकऱ्यांच्या कल्पकतेला शाबासकीची थाप

War Impact on Agri: युद्धामुळे खतांच्या किंमती वाढणार?

Ahilyanagar ZP Budget: अहिल्यानगर झेडपीच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी चार कोटी

Village Mapping: गावाचे मॅपिंग नसल्याने शेतकऱ्यांची वाढली चिंता

SCROLL FOR NEXT