Jowar Variety Agrowon
ॲग्रो विशेष

National Jowar Varieties: रब्बी ज्वारीचे दोन सुधारित वाण राष्ट्रीय स्तरावर प्रसारित

Mahatma Phule Agriculture University: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ज्वारी सुधार प्रकल्पाने विकसित केलेले रब्बी ज्वारीचे एस.पी.व्ही. २९१९ व एस.पी.व्ही. २७५१ हे दोन वाण राष्ट्रीय स्तरावर निवड समितीकडून प्रसारित करण्यात आले आहेत.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Ahilyanagar News: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ज्वारी सुधार प्रकल्पाने विकसित केलेले रब्बी ज्वारीचे एस.पी.व्ही. २९१९ व एस.पी.व्ही. २७५१ हे दोन वाण राष्ट्रीय स्तरावर निवड समितीकडून प्रसारित करण्यात आले आहेत.

रब्बी ज्वारीवर भाकृअप-भारतीय श्री अन्न संशोधन संस्था, हैदराबाद येथे नुकतेच राष्ट्रीय स्तरावरची ज्वारीची वार्षिक आढावा बैठक झाली. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कृषी शास्त्र विभागाचे उपमहासंचालक डॉ. डी. के. यादव होते. देशभरातील शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले एस.पी.व्ही. २९१९ व एस.पी.व्ही. २७५१ हे दोन वाण राष्ट्रीय स्तरावर प्रसारित करण्यात आले. एस.पी.व्ही. २९१९ हा वाण महाराष्ट्र गुजरात, कर्नाटक राज्यांतील भारी जमिनीसाठी चांगले उत्पन्न देणारा आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित ज्वारी सुधार प्रकल्प हे राज्यातील रब्बी हंगामामधील ज्वारी संशोधनाचे प्रमुख केंद्र असून येथे ज्वारी पिकाचे संशोधन करून त्यामधून जमिनीच्या प्रकारानुसार हलक्या, मध्यम व भारी जमिनीसाठी ज्वारीच्या उपपदार्थानुसार व कडबा गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने नवीन वाण विकसित केले जातात.

ज्वारी सुधार प्रकल्प येथील प्रक्षेत्रावर रब्बी हंगामामध्ये कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली, भारतीय श्रीअन्न संशोधन संस्था हैदराबाद यांच्या मार्गदर्शनाखाली ज्वारी पिकाचे विविध प्रयोग घेतले जातात. या संशोधनातून रब्बी ज्वारीचे एस.पी.व्ही. २९१९ व एस.पी.व्ही. २७५१ हे दोन वाण राष्ट्रीय स्तरावर निवड समितीकडून प्रसारित करण्यात आले.

भारतीय श्रीअन्न संशोधन संस्थेतील संचालक डॉ. तारा सत्यवती व प्रकल्प निर्देशक डॉ. आर. मधुसूदन यांचे या वाणांच्या निर्मितीमध्ये मार्गदर्शन मिळाले. यानिमित्त वरिष्ठ ज्वारी पैदासकार डॉ. व्ही. एल. अमोलिक यांच्या सहप्रकल्पातील शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पुढाकाराने ज्वारी सुधार प्रकल्पाचे दोन वाण राष्ट्रीय स्तरावर प्रसारित झाल्याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांनी अभिनंदन केले.

प्रसारित वाणाचे वैशिष्ट्य

एस.पी.व्ही. २९१९ हा वाण भारी जमिनीसाठी आहे. या वाणाचे हेक्टरी उत्पादन २९.२६ क्विंटल प्रति हेक्टरी आणि कडब्याचे उत्पादन ८०.५८ क्विंटल प्रति हेक्टरी इतके आहे. हा वाण धान्य व कडबा उत्पादनामध्ये उत्कृष्ट आहे. रोग व किडींसाठी प्रतिकारक आहे.

एस.पी.व्ही. २७५१ हा वाण हलक्या जमिनीसाठी प्रसारित करण्यात आला आहे. या वाणाचे हेक्टरी उत्पादन २३.०१ क्विटल प्रति हेक्टरी आणि कडब्याचे उत्पादन ८८.८२ क्विंटल प्रति हेक्टरी इतके आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: मक्याचा बाजार स्थिर; कापूस दर स्थिर, टोमॅटोमध्ये काहीसे चढ उतार, तर डाळिंब व केळीला चांगली मागणी कायम

Mhaisal Lift Irrigation : ‘म्हैसाळ’साठी सौरऊर्जा प्रकल्पाचा नव्या वर्षात प्रारंभ

Wildlife Crop Damage : शाहूवाडीत वन्यप्राण्यांचा धुमाकूळ, शेतीचे नुकसान

Agriculture Electricity : कृषिपंपांच्या वीज संयोजनासाठी प्रतीक्षा कायम

Monsoon Rain Update : राज्यात पावसाचा जोर वाढणार; पुढील पाच दिवसांचा अंदाज जाहीर

SCROLL FOR NEXT