Rabbi Jowar Variety : कोरडवाहू, बागायतीसाठी रब्बी ज्वारीचे वाण

Rabbi Jowar : कोरडवाहू पेरणी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत जमिनीत पुरेशी ओल असल्यास करावी. विविध भागांतील पाऊस परिस्थिती, जमिनीतील उपलब्ध ओलाव्यानुसार पेरणीचे नियोजन करणे आवश्यक आहे.
Rabbi Jowar Variety
Rabbi Jowar VarietyAgrowon
Published on
Updated on

डॉ. अनिल राजगुरू, डॉ. आदिनाथ ताकटे
Rabi Sorghum : कोरडवाहू पेरणी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत जमिनीत पुरेशी ओल असल्यास करावी. विविध भागांतील पाऊस परिस्थिती, जमिनीतील उपलब्ध ओलाव्यानुसार पेरणीचे नियोजन करणे आवश्यक आहे.

फुले यशोमती ः
-पश्‍चिम महाराष्ट्रातील हलक्या कोरडवाहू जमिनीसाठी प्रसारित
-धान्य उत्पादन - ९.२ क्विं./हे.
-चारा उत्पादन - ४२.६ क्विं./हे.
-शुभ्र पांढऱ्या आकाराचे गोलाकार दाणे
-पक्वता कालावधी -११२ ते ११५ दिवस
-पश्‍चिम महाराष्ट्रातील जिरायती क्षेत्रातील उथळ जमिनीसाठी शिफारस

फुले अनुराधा ः
-कोरडवाहू क्षेत्रासाठी, हलक्या जमिनीसाठी लागवडीस योग्य.
-पक्व होण्याचा कालावधी १०५ ते ११० दिवस.
-अवर्षणास प्रतिकारक्षम
-भाकरी उत्कृष्ट, चवदार
-कडबा अधिक पौष्टिक व पाचक
-खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम
- कोरडवाहू धान्य उत्पादन सरासरी प्रति हेक्टरी ८-१० क्विं. आणि कडबा ३० -३५ क्विं.

फुले माउली ः
-हलक्या व मध्यम जमिनीसाठी लागवडीस योग्य
-पक्व होण्याचा कालावधी ११० ते ११५ दिवस
-भाकरीची चव उत्तम
-कडबा पौष्टिक व चवदार
-धान्याचे उत्पादन हलक्या जमिनीत हेक्टरी ७-८ क्विं. आणि कडबा २०-३० क्विं.
-धान्याचे उत्पादन मध्यम जमिनीत हेक्टरी १५-२० क्विं. आणि कडबा ४०-५० क्विं.

फुले सुचित्रा ः
-मध्यम जमिनीसाठी शिफारस
-पक्व होण्याचा कालावधी ११० ते ११५ दिवस
-उत्कृष्ट धान्य व कडबा प्रत
-धान्य उत्पादन २४-२८ क्विं. आणि कडबा ६०-६५ क्विं.

फुले वसुधा
-भारी जमिनिकारिता कोरडवाहू, बागायती जमिनीसाठी शिफारस
- पक्व होण्याचा कालावधी ११६ ते १२० दिवस
- दाणे मोत्यासारखे, पांढरेशुभ्र चमकदार
- भाकरीची चव उत्तम
- ताटे भरीव, रसदार व गोड
- खोडमाशी, खडखड्या रोगास प्रतिकारक्षम
-कोरडवाहू धान्य उत्पादन सरासरी प्रति हेक्टरी २४-२८ क्विं. आणि कडबा ६५-७० क्विं.
बागायती धान्य उत्पादन सरासरी प्रति हेक्टरी ३०-३५ क्विं. आणि कडबा ७०-७५ क्विं.

फुले यशोदा
-भारी जमिनीत लागवडीसाठी प्रसारित
-पक्व होण्याचा कालावधी १२० ते १२५ दिवस
-दाणे मोत्यासारखे, पांढरेशुभ्र चमकदार, भाकरीची चव चांगली
-कोरडवाहू धान्य उत्पादन सरासरी प्रति हेक्टरी २५-२८ क्विं./हे., कडबा ६०-६५ क्विं./हे.
बागायती धान्य उत्पादन सरासरी प्रति हेक्टरी ३०-३५ क्विं./हे., कडबा ७०-८० क्विं./हे.

Rabbi Jowar Variety
Rabbi Jowar Area : रब्बी ज्वारीचे क्षेत्र यंदा ८० हजार हेक्टरने घटले

फुले पूर्वा (आर एस व्ही २३७१)ः
- पाण्याचा ताण सहन करणारा
-जिरायती भागातील खोल काळ्या जमिनीसाठी शिफारशीत
-कालावधी ११८ ते १२० दिवस
-पांढरे शुभ्र टपोरे व गोलाकार दाणे
-न लोळणारा, काढणीस सुलभ
-धान्य उत्पादन -२३.७ क्विं./हे., कडबा ७०-८० क्विं./हे.

सी एस व्ही. २२
- भारी जमिनीकरिता कोरडवाहू व बागायती जमिनीसाठी शिफारस
- पक्व होण्याचा कालावधी ११६ ते १२० दिवस
- दाणे मोत्यासारखे चमकदार, भाकरीची चव चांगली
- खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम
- कोरडवाहू धान्य उत्पादन सरासरी प्रति हेक्टरी २४-२८ क्विं., कडबा ६५-७० क्विं.
- बागायती धान्य उत्पादन सरासरी प्रति हेक्टरी ३०-३५ क्विं., कडबा ७०-८० क्विं.

Rabbi Jowar Variety
Rabbi Jowar : रब्बी ज्वारी काढणीस सुरुवात

परभणी मोती
-भारी जमिनीकरिता कोरडवाहू, बागायती जमिनीसाठी शिफारस
-पक्व होण्याचा कालावधी १२५ ते १३० दिवस
-दाणे मोत्यासारखे, पांढरेशुभ्र चमकदार,
-खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम
-कोरडवाहू धान्य उत्पादन सरासरी प्रति हेक्टरी १७ क्विं., कडबा ५०-६० क्विं.
-बागायती धान्य उत्पादन सरासरी प्रति हेक्टरी ३२ क्विं., कडबा ६०-७० क्विं.

फुले रेवती
-भारी जमिनीत बागायतीसाठी शिफारस
-पक्व होण्याचा कालावधी ११८ ते १२० दिवस
-दाणे मोत्यासारखे, पांढरे चमकदार
-भाकरीची चव उत्कृष्ट
-कडबा पौष्टिक व अधिक पाचक
-धान्य उत्पादन सरासरी प्रती हेक्टरी ४०-४५ क्विं. व कडबा ९०-१०० क्विं.

मालदांडी ३५-१
-मध्यम खोल जमिनीत कोरडवाहूसाठी शिफारस
-पक्व होण्याचा कालावधी ११८ ते १२० दिवस
-दाणे चमकदार, पांढरे, भाकरीची चव चांगली
-खोडमाशी प्रतिकारक्षम
-धान्य उत्पादन सरासरी प्रति हेक्टरी १५-१८ क्विं., कडबा ६० क्विं.

फुले उत्तरा
-हुरड्यासाठी शिफारस, हुरड्याची अवस्था येण्यास ९०-१०० दिवस
-भोंडातून दाणे सहज बाहेर पडतात
-सरासरी ७०-९० ग्रॅम इतका हुरडा मिळतो.
- हुरडा चवीस सरस अत्यंत गोड, शिवाय ताटेही गोड असल्याने जनावरे कडबा चवीने खातात.

फुले मधुर
-हुरड्यासाठी शिफारस
-हुरड्याची अवस्था येण्यास ९३-९८ दिवस लागतात
-वाण उंच असून पालेदार आहे.
-हुरडा अवस्थेत दाणे सहज सुटण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
- उत्कृष्ट प्रतीचा व चवदार हुरडा मिळतो.
- हुरडा उत्पादन ३०-३५ क्विं /हेक्टर

फुले पंचमी
-लाह्याचे प्रमाण (वजनानुसार) ८७.४ टक्के.
-लाह्या मोठ्या प्रमाणात फुटून रंगाने पांढऱ्या शुभ्र होतात
-खोडमाशी, खडखड्या रोगास प्रतिकारक्षम
-कोरडवाहू क्षेत्रासाठी लाह्यांसाठी प्रसारित.

जमिनीच्या खोलीनुसार कोरडवाहू, बागायती क्षेत्रासाठी शिफारशीत सुधारित/संकरित वाण :

१) हलकी जमीन ( खोली ३० से.मी)---फुले अनुराधा, फुले माऊली, फुले यशोमती
२) मध्यम जमीन (खोली ६० से.मी)---फुले सुचित्रा, फुले माऊली, परभणी मोती, मालदांडी ३५-१
३) भारी जमीन (६० से.मी पेक्षा जास्त)--- सुधारित वाण: फुले वसुधा, फुले यशोदा, सी.एस.व्ही. २२, पी.के..व्ही. क्रांती, परभणी मोती, फुले पूर्वा
संकरित वाण ः सी.एस.एच.१५ आणि सी.एस.एच. १९
४) बागायतीसाठी---फुले रेवती, फुले वसुधा, सी.एस.व्ही. १८, सी.एस.एच.१५, सी.एस.एच. १९
५) हुरड्यासाठी---फुले उत्तरा, फुले मधुर
६) लाह्यांसाठी---फुले पंचमी
७) पापडासाठी---फुले रोहिणी

लागवडीचे नियोजन ः
१) कोरडवाहू पेरणी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत जमिनीत पुरेशी ओल असल्यास करावी. शक्यतो हस्ताचा पाऊस पडून गेल्यावर पेरणी करणे फायदेशीर आहे.
२) योग्य वेळी पेरणी न झाल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव अधिक होतो. पेरणीपूर्वी एक किलो बियाण्यास ३०० मेष गंधकाची ४ ग्रॅम बीजप्रक्रिया करावी. त्यामुळे काणी रोगाचा प्रादुर्भाव होत नाही.
गंधकाची प्रक्रिया केल्यानंतर १० किलो बियाण्यास प्रत्येकी २५० ग्रॅम अॅझोटोबॅक्टर आणि पीएसबी जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी. प्रति हेक्टरी १० किलो बियाणे वापरावे.
३) पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने ४५ × १५ से.मी अंतरावर एकाच वेळी खते व बियाणे स्वतंत्र दोन चाड्यांतून पेरावे. बागायत ज्वारीचे अपेक्षित उत्पादन मिळविण्यासाठी ज्वारीची पेरणी ४५ × १२ सेंमी. अंतरावर करावी. कोरडवाहू ज्वारीसाठी दोन रोपांतील अंतर २० सेंमी ठेवावे. पेरणीच्या वेळी संपूर्ण नत्र, स्फुरद व पालाश द्यावे.

खतमात्रा ः
रासायनिक खतांचे हेक्टरी प्रमाण (किलो)
कोरडवाहू---------------बागायती
नत्र (युरिया)---स्फुरद (एसएसपी)---पालाश (एमओपी)-----नत्र (युरिया)---स्फुरद (एसएसपी)---पालाश (एमओपी)
जमिनीची प्रकार
(खोली सेंमी.)
हलकी (३०-४५ सेंमी.)---२५(५५)-----------
मध्यम (४५-६० सेंमी)---४० (८७)---२० (१२५)----८०* (१७४)----४० (२५०)---४० (६७)
भारी (६० पेक्षा जास्त)---६० (१३०)---३० (१८८)----१००* (२१७)---५० (३१३)---५० (८४)

टीप ः
१) नत्र दोन हप्त्यांत (पेरणीवेळी अर्धे व पेरणीनंतर एक महिन्याने अर्धे), संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळेस द्यावे.
२) कोरडवाहू जमिनीस संपूर्ण नत्र, स्फुरद व पालाश दोन चाड्यांच्या पाभरीने पेरून द्यावे. (५० : २५:२५ किलो /हेक्टरी नत्र : स्फुरद : पालाश)
-------------------------------------------------
संपर्क ः डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९
(एकात्मिक शेती पद्धती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com