Is Paddy Farming Causing Climate Change?: आजही अनेकांना भात खाल्ल्याशिवाय जेवल्यासारखे वाटत नाही. पण कोट्यवधी लोकांचे पोट भरणाऱ्या भातशेतीबाबत पर्यावरणीय चिंता व्यक्त करण्यात आली आहे. कारण भारतातील भातशेती हवामान बदलाच्या संकटाला कारणीभूत ठरत आहे. भात पृथ्वीचे तापमान वाढवत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे..'इंडिया टुडे'ने तज्ज्ञांच्या हवाल्याने यावर सविस्तर विश्लेषणात्मक वृत्त दिले आहे. भारतात भात हे अन्य अत्यंत लोकप्रिय आहे. पण या पिकाच्या उत्पादनामुळे हवामान बदलाचे एक दुष्टचक्र निर्माण झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे..केरळ सरकारच्या कृषी विकास आणि शेतकरी कल्याण विभागाचे माजी संचालक हरीकुमार बालकृष्णन नायर यांच्या मते, भात जगातील मोठ्या लोकसंख्येसाठी अन्नसुरक्षा सुनिश्चित करते. मात्र त्याचवेळी ते पर्यावरणाबाबत चिंताही निर्माण करते. कारण भात शेती क्षेत्रातून मिथेन वायूची निर्मिती होते. हा एक अत्यंत शक्तिशाली असा हरितगृह वायू आहे. तो ओझोनचा ऱ्हास होण्यास कारणीभूत ठरत आहे. तसेच भात हे अधिक पाण्यावर येणारे पीक आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होतो. विशेषतः ज्या भागांत अपुरी सिंचन व्यवस्था आहे, तेथे भात शेतीमुळे भूगर्भातील पाणीपातळी खालावते..Paddy Procurement: गोंदियातील धान खरेदीचे २४८ कोटींचे चुकारे थकीत.भातशेती अनेक महिने पाण्याखाली असते. शेतात पाणी साचून राहिल्याने जमिनीतील जीवाणू मिथेन वायू उत्सर्जित करतात, जो वातावरणासाठी CO2 पेक्षा खूपच हानिकारक आहे. .PM Kusum Yojana: पीएम- कुसुम योजना खरंच शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे का?.भात ही एकसुरी पद्धतीचे पीक आहे आणि त्याच्या लागवडीमुळे पोषक तत्वांचा ऱ्हास, कीडनाशकांमुळे मातीचे प्रदूषण आणि मातीचे आरोग्यही बिघडू शकते, असे नायर यांचे म्हणणे आहे..मिथेन उत्सर्जनाचं प्रमाण सातत्यानं वाढतंयभारतातील ७२६ भात क्षेत्रात केलेल्या एका अभ्यासात, गेल्या पाच दशकांत मिथेन उत्सर्जनाचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे आढळून आले आहे. भात शेती क्षेत्र हे जणू हळूहळू अदृश्य उत्सर्जनाचा स्रोत म्हणून काम करते. दरवर्षी सुमारे १५० दशलक्ष टन तांदूळ उत्पादन घेणारा भारत नुकताच चीनला मागे टाकून जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश बनला. यामुळे अन्नसुरक्षा सुनिश्चित झाली असली तरी हे पीक तापमानवाढीला कारणीभूत ठरत असल्याचे तज्ज्ञ सांगतात..भातशेती जी तापमानवाढीस कारणीभूत ठरत आहे; तीच आता या पिकावर परिणाम करु लागली आहे. शेती क्षेत्राला अनेकदा हानी पोहोचवणाऱ्या अत्यंत प्रतिकूल घटनांमुळे, या शतकाच्या अखेरीस भारतातील भात उत्पादनात ३ ते २२ टक्के घट होऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.