Solapur News: सोलापूर जिल्ह्यात कांद्याचे उत्पादन भरघोस झाले असले, तरी बाजारभाव कोसळल्याने शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे. प्रतिएकरी सुमारे १ लाख २ हजारांपर्यंत भांडवली खर्च करूनही शेतकऱ्यांच्या हातात अवघे ६३ हजार रुपयेच पडत आहेत. चार महिने रात्रंदिवस केलेले श्रम आणि भांडवलातील ३५ ते ४० हजार रुपये दोन्ही बुडाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. सरकारने गांभीर्याने पावले न उचलल्यास कांदा उत्पादक कर्जाच्या खाईत लोटला जाण्याची भीती आहे. .सोलापुरातील कृषी विज्ञान केंद्राच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात एक एकर कांदा उत्पादनासाठी ६२ हजारांपासून लाख रुपयांहून अधिकचा भांडवली खर्च येतो. त्या खर्चामध्ये शेतकऱ्यांच्या श्रमांचे मोल धरलेले नाही. केंद्राकडील नोंदीनुसार कांद्याची सरासरी उत्पादकता ९० क्विंटल असते. सध्या कांद्याला सरासरी सात रुपये प्रतिकिलो इतका दर मिळत आहे. मिळणारा दर आणि उत्पादन खर्च यांचे गणित मांडल्यास शेतकऱ्याला सध्या प्रतिएकरी ४० हजारांची पदरमोड करावी लागत आहे..Onion Crisis: कांदाप्रश्नी केंद्राचा हस्तक्षेप गरजेचा.या नुकसानीमुळे कांदा उत्पादक शेतकरी कर्जाच्या खाईत सापडत चालला असून, हातात उत्पन्न येत नसल्यामुळे प्रपंच कसा भागवावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे..कांदा उत्पादनातील टप्पे व प्रति एकरी खर्च (रुपयांमध्ये)रोपवाटिका तयार करणेबियाणे दीड किलो : ३३००शेणखत एक ट्रॉली : ४०००वाहतूक व मजुरी : १३००रोपवाटिका तयार करणे : १०००रोपातील तणनिर्मूलन : ४५००.Onion Crisis: पावसामुळे पीक येण्याची शक्यता नसल्याने कांद्यावर फिरवला रोटाव्हेटर.एकूण खर्च : १४१००कांदा लागवडसारे किंवा वाफे तयार करणे : १५००लागवड मजुरी : ११०००रोप लागवड प्रक्रिया : १०००एकूण खर्च : १३५००.कांदा पीक संवर्धनखताचा पहिला हप्ता : ४४००खताचा दुसरा हप्ता : ४४००शेणखताची गाडी : २००००औषध फवारणी तीन : २४००दोन वेळा खुरपणी : २०,०००एकूण :५१२००.कांदा काढणीकाढणी मजुरी : १००००पिशवी (३९ रुपये) : ८०००वाहतूक : ६०००एकूण खर्च : २४०००वरील सर्व टप्प्यावरील मिळून प्रति एकरी खर्च १ लाख ०२ हजार इतका आहे. हा कमीत कमी खर्च कांदा उत्पादनाला येत आहे. यामध्ये विपरीत हवामान किंवा कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यास फवारण्यांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.