MSP Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

NAFED : जालना जिल्ह्यात नाफेडची बारा खरेदी केंद्रे

MSP Procurement : खुल्या बाजार शेतमालाचे भाव कोसळल्यानंतर केंद्र शासनाच्या वतीने शेतमालांची हमीभावाने खरेदी करण्यासाठी नाफेडच्या वतीने खरेदी केंद्र सुरू केले जात आहेत.

Team Agrowon

Jalna News : खुल्या बाजार शेतमालाचे भाव कोसळल्यानंतर केंद्र शासनाच्या वतीने शेतमालांची हमीभावाने खरेदी करण्यासाठी नाफेडच्या वतीने खरेदी केंद्र सुरू केले जात आहेत. जिल्ह्यात नाफेडचे १२ ठिकाणी खरेदी केंद्र सुरू झाले आहेत. मूग, उडीद, सोयाबीन पिकांची हमीभावाने खरेदी सुरू झाली आहे.

यंदा केंद्र शासनाने मुगाला आठ हजार ६८२, उडीद सात हजार ४०० आणि सोयाबीन चार ८९२ रुपये प्रती क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. या तीन पिकांची खरेदी करण्यासाठी केंद्र खरेदी केंद्र सुरू केले आहेत.

यामध्ये अंबड तालुका खरेदी विक्री संघ, जालना कृषी उत्पन्न बाजार समिती येथे जाडाई फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी, भोकरदन येथे मे. पूर्णा केळणा फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी, मंठा येथे नानसी शेतकरी धान्य अधिकोष संस्था, माहोरा येथे अॅग्रीटच फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी, बदनापूर येथे श्री.एकविरा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,

परतूर येथे श्री गणेश कृषी उपयोगी साहित्य पुरवठा शेती सह संस्था, वाटूर येथे श्रीराम अंध अपंग औद्यो. उद्योजक सेवा संस्था, जाफराबाद येथे जीवरेखा अॅग्री प्रोड्युसर कंपनी, आन्वा येथे वीर छत्रपती सुशिक्षित बेरोजगार सह संस्था, राजूर येथे वैष्णवी अभिवन सहकारी संस्था आणि आष्टी येथे हर्षवर्धन कृषी विकास प्रोड्यूसर कंपनीकडून हमी भावाने खरेदी सुरू केली आहे.

शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यानंतर खरेदी केंद्रावर शेतमाला घेऊन जाताना त्याची अद्रता १२ टक्के पेक्षा कमी असावी, याची काळजी घ्यावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT