Tur Production Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Production : रोगावर नियंत्रण मिळवत तूर उत्पादनात जपले सातत्य

Tur Crop : सुरुवातीच्या काळामध्ये तूर पिकामध्ये तूर मर व वांझ रोगाच्या प्रादुर्भावामुळे अनेक समस्या येऊ लागल्या. मात्र त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

Team Agrowon

नाव : धनंजय मोहनराव डाके
गाव : खादगाव, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर
एकूण शेती : २५ एकर (एकत्र कुटुंब)
तूर क्षेत्र : तूर गोदावरी ४ एकर, सोयाबीन अधिक बीडीएन - ७११ तूर चार एकर.
अन्य पिके ः मोसंबी १२ एकर, ऊस ५ एकर

Tur Crop Management : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण तालुका तसा मोसंबीचा तालुका. परंतु अलीकडे तूर हे पीक मोठ्या प्रमाणात या तालुक्यात रुजते आहे. येथील खादगाव येथील डाके कुटुंबांनी गेल्या सहा वर्षांपासून तुरीचे पीक घेणे सुरू केले. सुरुवातीच्या काळामध्ये तूर पिकामध्ये तूर मर व वांझ रोगाच्या प्रादुर्भावामुळे अनेक समस्या येऊ लागल्या. मात्र त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांनी बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्रातून बीडीएन ७११ व बीडीएन २०१३ - ४१ (गोदावरी) हे दोन वाण आणले. त्यानंतर डाके कुटुंबीय सातत्याने तुरीचे केवळ पीक घेतात असे नव्हे तर शाश्‍वत उत्पादनही घेतात.

...असे असते तुरीचे व्यवस्थापन
तुरीचे रान तयार करण्यासाठी खोल नांगरट केली जाते. दरवर्षी साधारणतः एकरी एक ट्रॉली शेणखतही शेतात टाकले जाते. त्यानंतर पाऊस पडण्याआधी रोटाव्हेटर मारून रान पेरणीसाठी तयार केले जाते. चार एकर क्षेत्रामध्ये सोयाबीन बरोबर आंतरपीक म्हणून ‘बीडीएन ७११’ हे तुरीचे वाण पेरले जाते. दरवर्षी साधारणतः ७ ते १५ जून दरम्यान पावसाचे आगमन झाले, की लगेच केली जाते. गतवर्षी थोडी विलंबाने म्हणजे २१ जूनला तुरीची पेरणी व लागवड केली होती. यंदा १५ जूनलाच पेरणी व लागवड पावसाच्या आगमनाने आटोपली आहे.
पेरणी करतेवेळी सोयाबीनच्या दर चार तासानंतर एक तास तुरीचा घातला जातो. यामध्ये सोयाबीनचा तास व तुरीच्या ओळीतील अंतर १८ इंचांचे असते. याशिवाय चार एकरांत गोदावरी तुरीची जवळपास दोन वर्षांपासून निखळ लागवड ही टोकण यंत्राच्या साह्याने केली जाते. या लागवडीत तुरीच्या दोन ओळीतील अंतर सात फूट, तर तुरीच्या दोन रोपांतील अंतर नऊ इंच राहील याची खबरदारी घेतली जाते.

खत व्यवस्थापन
तुरीला पहिला, रासायनिक खताचा डोस लागवड व पेरणी वेळी २०:२० :० :१३ एकरी दीड बॅग (७५ किलो) असा दिला जातो. त्यानंतर सप्टेंबरमध्ये दुसरा डोस एक बॅग डीएपी अधिक २५ किलो पोटॅश तूर फुलांवर येण्याआधी पेरून दिला जातो.

...असे आहे कीड रोग व्यवस्थापन
आजवरच्या व्यवस्थापनामध्ये तूर लहान असताना रस शोषक किडी, त्यानंतर साधारणतः दुसऱ्या महिन्यात पाने गुंडाळणारी अळी आढळून येत असल्याचा डाके कुटुंबीयांचा अनुभव आहे. पहिल्या टप्प्यात येणाऱ्या रोगांच्या व्यवस्थापनासाठी लागवडीनंतर एक महिन्याने बुरशीनाशकाची फवारणी घेतली जाते. त्यानंतर पाने गुंडाळणारी अळी नियंत्रणासाठी शिफारशीत कीडनाशकाची फवारणी केली जाते. तर गुंडी अवस्थेत ०:५२:३४ सह कीटकनाशक व बुरशीनाशकाची एकत्रित फवारणी केली जाते. त्यानंतर वादी अवस्थेत कीटकनाशक व ०:०:५० ची फवारणी घेतल्यामुळे दर्जेदार उत्पादन मिळत असल्याचे धनंजय डाके सांगतात.

सिंचन व्यवस्थापन
पेरणी व लागवडीनंतर तुरीला पाणी देण्याची गरज पडत नाही. परंतु फूल अवस्थेत व शेंग लागण्याआधी तुरीला दांडाने पाणी दिले जाते. गोदावरी वाणाला दोन पाणी दिले जातात. तर बीडीएन ७११ ला शेंगा लागल्यानंतर एक वेळा पाणी दिले तरी पुरेसे होत असल्याचा अनुभव आहे.

तण व्यवस्थापन
तण व्यवस्थापनासाठी तीन ते चार वेळा निखळ तुरीत वखरणी केली जाते. याशिवाय सोयाबीनमधील आंतरपिकात कोळपणी सोबत दोन्ही प्रकारच्या तूर पिकात दोन वेळा खुरपणी केली जाते.

महत्त्वाचे

- कुटुंबातील सहा व्यक्ती शेतात राबत असल्यामुळे व्यवस्थापन सोपे होते.
- तूर पिकाचा उत्पादन खर्च साधारणपणे १६ ते १७ हजार रुपये प्रति एकर खर्च होतो. ‘बीडीएन ७११’ चे उत्पादन एकरी साडेनऊ ते दहा क्विंटल, तर गोदावरी तुरीचे एकरी १३ क्विंटल मिळते. गेल्या वर्षी ६५०० रुपये प्रतिक्विंटल, तर यंदा ९५०० प्रतिक्विंटल असा दर मिळाला.

धनंजय डाके, ९९७५३७८१३९
(शब्दांकन : संतोष मुंढे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हिरवी मिरची टिकून; गव्हाला मागणी कायम, भेंडीला चांगला उठाव, कोथिंबीरचे भाव स्थिरावले, तर सूर्यफुलाच्या भावात मंदी

Gokul Dudh Sangh: गोकुळ दूध संघ आता आईस्क्रीम, चीज बाजारात आणणार, सभेत घोषणा, बैठकीत नेमकं काय ठरलं?

Rain Crop Damage : अतिवृष्टी, पुराने सांगलीत ७ कोटींचे नुकसान

Gold Price Rise: सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये जबरदस्त तेजी; नवीन उच्चांकाने गुंतवणूकदारांची धाकधुक वाढली

Kunbi Certificate: कुणबी दाखले देण्याची प्रक्रियी सुरु; मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती

SCROLL FOR NEXT