Pune News: देशभरातील सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये प्रचंड उठाव पाहायला मिळाला आहे. आयबीजेएने जाहीर केलेल्या दरांनुसार, २४ कॅरेट सोन्याचा एक तोळा जीएसटीसह १ लाख १२ हजार ४१७ रुपयांवर पोहोचला असून, चांदीचा प्रति किलो दर १ लाख २८ हजार ४२९ रुपये झाला आहे. .सप्टेंबरमध्ये सोन्यात ४ हजार ३५१ आणि चांदीत ८ हजार ८३९ रुपयांची वाढ नोंदवली गेली. ग्रामीण भागात सणासुदीच्या काळात विशेषत: गुंतवणुकीसाठी सोने आणि चांदीला प्राधान्य दिले जाते. परंतु सोने-चांदी दरातील उसळीने ग्रामीण भागातील गुंतवणूकदारांची धाकधुक वाढली आहे. .Gold Price India: २००० पासून २०२५ पर्यंत भारतातील सोन्याचा किंमतीचा प्रवास; वाचा एका क्लिकवर.आयबीजेएच्या सोमवारच्या माहितीनुसार, चांदीचा दर जीएसटी वगळता १ लाख २४ हजार ४१३ रुपये प्रति किलो होता, तर सोन्याचा एक तोळ्याचा दर जीएसटीशिवाय १ लाख ८ हजार ३७ रुपये इतका नोंदवला गेला..पण मंगळवारी बाजारात आणखी एक धक्कादायक वाढ झाली. सोन्याच्या किमतीत १ हजार १०६ रुपयांची कमाल वाढ होऊन जीएसटीशिवाय एका तोळ्याचा दर १ लाख ९ हजार १४३ रुपयांवर गेला. याचप्रमाणे चांदीतही २७६ रुपयांची वाढ होऊन प्रति किलोचा दर वाढला. .Gold Price Drop: सोने दरात घसरणीचा कल.सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत सोन्याच्या दरात एकूण ४३५१ रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे, तर चांदीच्या किमतीत प्रति किलो ८८३९ रुपयांची उछाळ घेतली आहे. आयबीजेएच्या ताज्या आकडेवारीनुसार चांदीचा जीएसटीशिवायचा दर आता १ लाख २४ हजार ६८९ रुपये इतका आहे..तुलनेसाठी, गेल्या महिन्यात ऑगस्टमध्ये सोन्याचा एक तोळ्याचा दर १ लाख २ हजार ३८८ रुपये आणि चांदीचा प्रति किलोचा दर १ लाख १७ हजार ५७२ रुपये इतका होता. या आकड्यांमधील फरक पाहता बाजारातील अस्थिरतेचे स्पष्ट चित्र दिसून येते..Gold Rate: गणेशोत्सवाच्या काळात सोनं-चांदीच्या दरात वाढ; ग्राहक आणि ज्वेलर्स चिंतेत.या तेजीचा परिणाम विविध प्रकारच्या सोन्यावरही दिसून आला आहे. उदाहरणार्थ, २३ कॅरेट सोन्याच्या दरात १ हजार १०६ रुपयांची वाढ होऊन जीएसटीशिवाय तो १ लाख ८ हजार ७०६ रुपये प्रति १० ग्रॅम झाला, तर जीएसटीसह हा दर १ लाख ११ हजार ९६७ रुपयांवर पोहोचला. २२ कॅरेट सोन्याच्या बाबतीत १ हजार १३ रुपयांची वाढ नोंदवली गेली असून, जीएसटीशिवायचा दर ९९ हजार ९७५ रुपये इतका झाला आहे. जीएसटी जोडल्यावर हा दर १ लाख २ हजार ९७४ रुपयांपर्यंत वाढतो. .त्याचप्रमाणे, १८ कॅरेट सोन्याच्या किमतीत ८२९ रुपयांची वाढ होऊन जीएसटीशिवायचा दर ८१ हजार ८५७ रुपये झाला, आणि जीएसटीसह तो ८४ हजार ३१२ रुपये आहे. तर, १४ कॅरेट सोन्याचा जीएसटीसह एका तोळ्याचा दर ६५ हजार ७६४ रुपये इतका निश्चित झाला आहे. हे दर विविध दागिन्यांच्या प्रकारांनुसार बदलतात, पण एकूणच बाजारातील हा ट्रेंड गुंतवणूकदारांना विचार करण्यास भाग पाडत आहे..आयबीजेए हे सोने-चांदीचे अधिकृत दर देशभर जाहीर करणारे प्रमुख संस्था आहे. मात्र, या दरांमध्ये आणि तुमच्या स्थानिक शहरातील सराफा बाजारातील प्रत्यक्ष किमतींमध्ये १ हजार ते २ हजार रुपयांपर्यंतचा फरक असू शकतो. .दरम्यान, भारतातील या तेजीचा प्रभाव फक्त देशांतर्गत नाही, तर आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ होत आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे जागतिक व्यापारात निर्माण झालेल्या अनिश्चिततेने बाजार हादरला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.