Tiger Terror  Agrowon
ॲग्रो विशेष

Tiger Footprint : तुळजापूरचा वाघ अखेर येडशी अभयारण्यात परतला

Yedshi Wildlife Sanctuary : मागील काही दिवसांपूर्वी तुळजापूर तालुक्यातील कामठा परिसरात गेलेला वाघ अखेर येडशी अभयारण्यात परतला आहे.

Team Agrowon

Dharashib News : मागील काही दिवसांपूर्वी तुळजापूर तालुक्यातील कामठा परिसरात गेलेला वाघ अखेर येडशी अभयारण्यात परतला आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघाचा मुक्काम येडशी अभयारण्यात जुने रामलिंग मंदिर परिसरात असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या परिसरात वाघाच्या पायांचे ठसे आढळले आहेत. विशेष म्हणजे, याच भागात बिबट्याचाही वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. धाराशिव जिल्ह्यातील घाटंग्री भागात मंगळवारी (ता. २५) रात्री बिबट्याने शेतातील जनावरांवर हल्ला केला.

या हल्ल्यात एका वासराचा मृत्यू झाला, तर गाय गंभीर जखमी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणी बिबट्याचे पायांचे ठसे आढळून आले आहेत.

धाराशिव-बार्शी महामार्गावरील हातलाई तलाव परिसरात मंगळवारी सकाळी नागरिकांना बिबट्यासदृश प्राणी आढळून आला. काही तासांतच घाटंग्री भागात जनावरांवर हल्ला झाल्याने या भागात बिबट्याचा सक्रिय वावर असल्याचे दिसून येत आहे.

वाघ आणि बिबट्या या दोन्ही हिंस्र प्राण्यांचा एकाच परिसरात वावर असल्याने शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

वाघ कामठ्यातून पुन्हा येडशी अभयारण्यात परतला आहे. सध्या त्याचा वावर जुन्या रामलिंग मंदिर परिसरात आहे. याशिवाय याच परिसरात बिबट्याच्या पायांचे ठसेही आढळून आले आहेत.
- बी. ए. पौळ, विभागीय वन अधिकारी, धाराशिव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Insurance: रब्बी पीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग कमीच

Police Patil Protest: पोलिस पाटलांची मोर्चाद्वारे बुधवारी विधिमंडळावर धडक

Panshet Road Demolition: धरणपरिसरात अतिक्रमणांवर हातोडा

School Shutdown: पुणे जिल्ह्यातील २०२३ शाळा बंद

Cotton Procurement: नांदेडला कापूस खरेदी कासव गतीने

SCROLL FOR NEXT