Pune News: जलसंपदा विभागाने नुकतीच पुणे-पानशेत रस्त्यावरील आपल्या मालकीच्या जागेतील अतिक्रमणांवर कडेकोट पोलिस बंदोबस्तात कारवाई केली. या कारवाईत १० हॉटेल्स व रिसॉर्टसह २० टपऱ्यांवर हातोडा चालविण्यात आला असून, लवकरच धरण परिसरातील सर्व अतिक्रमणे काढणार असल्याचे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले..खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. अतिक्रमण करणाऱ्यांना नोटीसद्वारे स्वतःहून बांधकामे काढून घेण्याबाबतचे निर्देश दोन दिवसांपूर्वी देण्यात आले होते. त्यानंतरही ही अतिक्रमणे हटविण्यात आली नाहीत..Flood Prevention : नदी, ओढे, नाल्यांतील अतिक्रमण आणि पूर समस्या.त्यामुळे भदाणे, वरसगाव धरण शाखा अभियंता प्रतीक्षा रावण मारके, पानशेत धरण शाखा अभियंता रोहन धामणे यांच्यासह पोलिस, महसूल आदी विभागांतील अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली जेसीबी मशिनसह विशेष पथकाने अतिक्रमणे हटविण्यात आली. त्यात बड्या धेंडांच्या बांधकामांचाही समावेश होता. .Pune APMC: अतिक्रमण कारवाई संथगतीने, मंत्र्यांच्या आदेशाची मोडतोड.जलसंपदा विभागाला अतिक्रमणे हटविण्यासाठी पोलिस, महसूल, जिल्हा परिषद, महापालिका, भूमिअभिलेख आदी विभागांना मदत करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे प्रथमच जलसंपदा विभागाच्या अतिक्रमण कारवाईत विविध विभागांचे अधिकारी, सुरक्षारक्षक कर्मचारी सहभागी झाले होते..‘पुणे-पानशेत रस्त्यालगत उभारलेल्या टपऱ्या, दुकाने तसेच धरण क्षेत्रातील शासकीय जागेत उभारलेली हॉटेल्स, रिसॉर्टवर कारवाई करण्यात आली आहे. काही हॉटेल मालकांनी स्वतःहून बांधकामे काढण्याची तयारी दर्शविल्याने त्यांना मुदत देण्यात आली आहे.मोहन भदाणे, उपविभागीय अभियंता, खडकवासला जलसंपदा विभाग.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.