
Solapur News : येडशी अभयारण्यातील वाघ पडकडण्यासाठी ताडोबा अभयारण्यातून आलेले पथक परत गेल्यानंतर ही जबाबदारी बिबटे पकडणाऱ्या पुणे येथील पथकावर आली आहे. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव विभागाने २८ फेब्रुवारीपर्यंतच्या मुदतीने आदेश दिला होता. या आदेशाला सात दिवसांची मुदत राहिल्याने पुन्हा नवीन आदेश काढावा लागणार आहे.
टिपेश्वर अभयारण्यातून येडशी अभयरण्यात दाखल झालेल्या वाघ १९ डिसेंबर २०२४ रोजी पहिल्यांदा ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाला होता. सध्या त्याचे वास्तव्य येडशी परिसरातच असून अडीच महिने त्याने बार्शी तालुका व धाराशिव जिल्ह्यातील २८ पाळीव प्राण्यांचा फडशा पाडला आहे.
९ फेब्रुवारी रोजी या वाघाला पडकडण्याचा प्रयत्न अपयशी ठरला होता. त्यानंतर भूल देण्यासाठी वापरण्यात येणारे औषध बदलण्यात येणार असल्याचे धाराशिवचे विभागीय वनाधिकारी बी. ए. पौळ यांनी सांगितले होते. मात्र, अद्याप हा वाघ पकडण्यात आलेला नसल्याने या आदेशाची मुदत संपल्यास वन विभागाला या आदेशाला मुदतवाढ द्यावी लागेल किंवा नवीन आदेश तरी काढावे लागणार आहेत.
पाळीव प्राण्यांवरील हल्ल्यात घट
डिसेंबरअखेर व जानेवारी महिन्यात येडशी अभयारण्यातून बाहेर पडून या वाघाने बार्शी तालुक्यातील उक्कडगाव, चारे, पांगरी, पांढरी, वैराग या परिसरात अनेक पाळीव प्राण्यावर हल्ले केले होते. मात्र, पुन्हा येडशी अभयारण्यात वाघ दाखल झाल्यापासून पाळीव प्राण्यावरील हल्ले घटले आहेत.
वाघाने काही पाळीव प्राणी ठार केले असले तरी अनेक रानडुकरे व हरणांची शिकार या वाघाने केली आहे.वाघाने एक शिकार केली की किमान चार दिवस पुन्हा काही खाण्याची त्याला गरज पडत नाही.
वाघाच्या प्रत्येक दहा पाळीव प्राण्याच्या हल्ल्यांमागे किमान १०० रानडुकरांची शिकार केली असेल. यामुळे वाघाचा येडशी- बार्शी परिसरातील शेतकऱ्याच्या उभ्या पिकाचे नुकसान करणाऱ्या हरीण, काळवीट व रानडुकरांच्या संख्येवर नैसर्गिक नियमन वाघामुळे होणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.