Pune News: वेतन कपातीच्या इशाऱ्याला न जुमानता ‘टीईटी’ सक्तीच्या आणि ‘संचमान्यता’ आदेशाच्या विरोधात विविध संघटनांच्या शिक्षकांनी पुणे जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढला होता. या आंदोलनामुळे पुणे जिल्ह्यातील ३५४६ पैकी २०२३ शाळा बंद राहिल्या, तर १० हजारांपैकी तब्बल ५२५७ शिक्षक सामूहिक रजेवर गेले होते, अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्रा.) संजय नाईकडे यांनी दिली. यापेक्षाही भव्य मोर्चा नागपूर हिवाळी अधिवेशनावर नेण्याचा निर्णयही यावेळी शिक्षकांनी घेतला..‘आम्हाला शिकवू द्या’ अशा घोषणा देत प्राथमिक व माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ‘पुणे जिल्हा शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती’च्या वतीने जिल्हा परिषदेपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला होता. यावेळी शिक्षक समितीचे राज्याचे कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर, शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे, मुख्याध्यापक महामंडळचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार सागर, शिक्षकेतर संघटनेचे राज्यसचिव शिवाजी खांडेकर, पेन्शन संघटनेचे संजय पापळे यांची प्रमुख भाषणे झाली. याप्रसंगी सुनील वाघ, खंडेराव ढोबळे, संदीप जगताप, प्रसाद गायकवाड, के. डी. डोमसे, संतोष गदादे, संजय कांबळे, राजेंद्र जगताप, सुनील जगताप, सचिन डिंबळे आदी उपस्थित होते..Model School: साखरा शाळेची गुणवत्ता, शिक्षकांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे.आंदोलनात शिक्षक संघ, शिक्षक समिती, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ, मुख्याध्यापक महामंडळ, केंद्रप्रमुख संघटना, जुनी पेन्शन संघटना, वस्तीशाळा शिक्षक संघटना, शिक्षक सेना, संस्थाचालक शिक्षण मंडळ, मागासवर्गीय शिक्षक संघटना आदी संघटना सहभागी झाल्या, अशी माहिती नंदकुमार होळकर यांनी दिली..दरम्यान, यामुळे जिल्ह्यात दोन हजारपेक्षा जास्त जिल्हा परिषद शाळा बंद राहिल्या तर उरलेल्या बहुतांश शाळांमध्येही शिक्षकसंख्या घटल्याने कामकाज विस्कळित झाले. काही माध्यमिक विद्यालयेही बंद राहिली तर काहींनी ‘सकाळ’ सत्रात विद्यालये भरविली..Rural School: दऱ्याखोऱ्यातील शाळा झपाट्याने बंद पडू लागल्या.टीईटीच्या दबावाने विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यावर परिणाम होतोय आणि संचमान्यता आदेशाने ग्रामीण शाळा बंद पडतील म्हणून तरी शासनाने दखल घ्यावी. अन्यथा पुढील टप्प्यात नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर राज्यातील सर्व शिक्षकांचा मोर्चा नेण्याचा निर्णय झाला आहे. त्यातही प्रश्न प्रलंबित राहिल्यास मुंबईतील आझाद मैदानावर व मंत्रालयावर मोर्चे काढले जातील, अशी माहिती शिक्षक समितीचे राज्य कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर यांनी दिली..या आहेत मागण्यासेवेतील शिक्षकांना ‘टीईटी’तून वगळावेनवा संचमान्यता आदेश मागे घ्यावाजुनी पेन्शन मिळावीशिक्षणसेवकांना नियमित वेतन मिळावेशिक्षकेतर कर्मचारी भरती करावीशिक्षणाचे कंत्राटीकरण थांबवावे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.