Ahilyanagar News: राज्यात रब्बीची यंदा आतापर्यंत ३३ लाख १७ हजार ३८३ लाख हेक्टरवर पेरणी झालेली असताना रब्बी पीकविमा योजनेत मात्र सहभाग कमीच आहे. आतापर्यंत राज्यात रब्बीत ३ लाख ६३ हजार शेतकऱ्यांचा सहभाग घेतला असून साडेचार लाख हेक्टर क्षेत्राचा पीकविमा उतरवला आहे. .आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार पीकविमा सहभागात सोलापूर, परभणी, नांदेड, लातुर, जालना, बीड जिल्हे पुढे आहेत. रब्बी पीकविमा योजनेत सहभागासाठी ज्वारीचा कालावधी संपला, गहू, हरभऱ्यासाठी आठ दिवस शिल्लक आहेत. गेल्या वर्षी रब्बीत २८ लाख ४६ हजार ६९ शेतकऱ्यांनी ३९ लाख ४४ हजार १९० हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवला होता..Rabi Crop Insurance: रब्बीच्या पीकविम्याकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ.मागील काळात एक रुपयांत पीकविमा योजना राबवण्यात आली. त्यामुळे योजनेत मोठ्या प्रमाणात सहभाग वाढला होता. यंदा खरिपासून मात्र एक रुपयांत पीक सहभाग योजना बंद झाली. त्यामुळे सहभाग कमी होत असल्याचे बोलले जात आहे. सततच्या पावसामुळे वापसा नसल्याने रब्बीच्या पेरण्याला उशीर झाला आहे..राज्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र ५७ लाख ८० हजार ४१७ हेक्टर असून यंदा आतापर्यंत सरासरीच्या ३३ लाख १७ हजार ३८३ हेक्टरवर ५७ टक्के पेरणी झाली आहे. यंदाही रब्बीसाठी पीकविमा योजना राबवली जात असून त्यात सहभागासाठीची ज्वारी पिकाची मुदत ३० नोव्हेंबरला संपली..Fruit Crop Insurance: केळी, आंब्याला हवामान आधारित विमा परतावा मंजूर.गहू, हरभऱ्याला १५ डिसेंबर, भुईमुगाला ३१ मार्च अंतिम तारीख आहे. अंतिम तारीख पाहता गहू, हरभरा पिकाच्या विम्यासाठी केवळ आठ दिवस शिल्लक आहेत. यंदा आतापर्यंत ३ लाख ६३ हजार शेतकऱ्यांनी सात लाख अर्जातून साडेचार लाख हेक्टर क्षेत्राचा सहभाग घेतला असून साडेचार लाख हेक्टर क्षेत्राचा पीकविमा उतरवला आहे. गहू, हरभरा पेरणी सुरू आहे. .परभणी, बीडमध्ये चांगला सहभागरब्बीसाठीच्या पंतप्रधान पीकविमा योजनेत यंदा अद्याप फारसा सहभाग दिसत नाही. आतापर्यंत (ता. ७) परभणी जिल्ह्यात सर्वाधिक ५६ हजार शेतकऱ्यांनी १ लाख सहा हजार अर्जांतून ७० हजार २२० हेक्टर, त्या पाठोपाठ बीडला ३७ हजार शेतकऱ्यांनी ४३ हजार ९०० हेक्टरवर, जालन्यात ३५ हजार ४२९ शेतकऱ्यांनी ४३ हजार १४० हेक्टर,.लातुर व नागपुरला प्रत्येकी ४१ हजार हेक्टरवर, सोलापुरला ३१ हजार शेतकऱ्यांनी बावीस हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी पीकविमा घेतला आहे. भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासह अन्य जिल्ह्यांत सहभाग कमी आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात १४ हजार १०४ शेतकऱ्यांनी आतापर्यंत १६ हजार ९९ क्षेत्राचा विमा उतरवला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.