Nanded News: नांदेड जिल्ह्यातील विविध कापूस खरेदी केंद्रांवर खरेदी प्रक्रियेला अद्याप गती मिळालेली नाही. एक डिसेंबरअखेर जिल्ह्यातील १९३३ शेतकऱ्यांकडून एकूण २८ हजार ८४७ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली. जिल्ह्यात कापूस विक्रीसाठी एकूण १४ हजार ६१९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ५०५१ नोंदी बाजार समितीने मंजूर केल्या असून, प्रलंबित नोंदींची संख्या ८१०७ आहे. न्यू भारत कॉटन नायगाव या केंद्रात सर्वाधिक ११ हजार ९०८ क्विंटल कापूस खरेदी झाला..जिल्ह्यात केंद्र शासनाच्या किमान हमी दरानुसार कापसाची खरेदी करण्यात येत आहे. यात मध्यम धाग्याच्या कपाशीला ७७१० रुपये क्विंटल, तर लांब धाग्याच्या कपाशीला ८११० रुपये क्विंटल दर आहे. जिल्ह्यात किनवट, अर्धापूर, भोकर, नायगाव व हदगाव या तालुक्यांत नऊ ठिकाणी खरेदी करण्यात येत आहे..CCI Cotton Procurement: ‘सीसीआय’ कापूस खरेदी मर्यादा वाढवा.अर्धापूर तालुक्यातील कलदगाव येथील सालासर जिनिंग येथे २८२ शेतकऱ्यांकडून ४६५०.०५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. याच केंद्रावर १५५९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. नटराज व बालाजी जिनिंग, तासगा (ता. हदगाव) येथे २३९१ क्विंटल खरेदी करण्यात आला. नटराज व बालाजी जिनिंग केंद्रांवर एकूण १६५८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. व्यंकटेश कॉटन, भोकर येथे २१८ शेतकऱ्यांचा २९२३ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला..Cotton Price: खेडा खरेदीत कापसाचे दर हमीभावापेक्षा कमीच.या केंद्रावर ३१६१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. न्यू भारत कॉटन, नायगाव येथे ११ हजार ९०८ क्विंटल कपाशीची खरेदी करण्यात आली. या केंद्रावर सर्वाधिक ५०२३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यातील ७७७ नोंदणीकृत शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात आला..मनजित कॉटन, एल.बी. कॉटन व महावीर जिनिंग या तीन केंद्रांनी ५१९४ क्विंटल इतकी कापूस खरेदी केली आहे. ३६६ शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात आला. विजय कॉटन, किनवट येथे १५८५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ७४ शेतकऱ्यांकडून १३७० क्विंटल कपाशीची खरेदी करण्यात आली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.