Onion Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Cultivation : जुन्नरच्या पूर्व भागात कांदा लागवडीकडे कल

Onion Rate : गेल्या वर्षी कांद्याला अतिशय कमी बाजारभाव मिळाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला होता. परंतु जेव्हा कांद्याला बाजारभाव वाढला, तेव्हा साठवून ठेवलेला कांदा पूर्णपणे सडला होता.

Team Agrowon

Pune News : तालुक्यात कुकडी प्रकल्पातील येडगाव, पिंपळगाव जोगे, चिल्हेवाडी, माणिक डोह, वडज ही पाच धरणे असून या धरणांच्या पाण्यावर तालुक्यात ऊस, केळी, द्राक्षे या पिकांबरोबर काद्यांचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात असते. सध्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने कांदा लागवडीकडे कल वाढलेला आहे.

गेल्या वर्षी कांद्याला अतिशय कमी बाजारभाव मिळाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला होता. परंतु जेव्हा कांद्याला बाजारभाव वाढला, तेव्हा साठवून ठेवलेला कांदा पूर्णपणे सडला होता. हा कांदा फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. तरी यामधून सावरून शेतकऱ्यांनी या वर्षी नवीन लागवडीला सुरुवात केली आहे.

तालुक्याच्या पूर्व भागातील आळेफाटा परिसरातील आळे, वडगाव आनंद, कोळवाडी, संतवाडी, राजुरी, जाधववाडी, बोरी, साळवाडी, भोरवाडी, शिरोली सुलतानपूर, वडगाव, कांदळी, चाळकवाडी, उंचखडक या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याच्या लागवडी होत असते. याही वर्षी दुसऱ्या टप्प्यातील कांद्याच्या लागवडीला सुरुवात झालेली आहे. परंतु बहुतेक शेतकरी बेड पद्धतीने लागवडी करताना दिसून येत आहे.

कारण बेड पद्धतीने लागवडी केल्यास पिकाला पाणी पण कमी द्यावे लागते. ते भरावे पण लागत नाही, याला फक्त ठिबक सिंचनाचा वापर करावा लागतो. शिवाय कमी व प्रमाणात पाणी दिल्याने कांदा देखील चांगला येत आहे.

तर सारा पद्धतीने लागवड केल्यास साऱ्यात जास्त पाणी साचल्याने कांदा फुगतही नाही व जास्त पाण्यामुळे रोपही खराब होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा बेड पद्धतीने लागवड करण्याकडे कल वाढला आहे.

दरम्यान सध्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांच्या कल वाढलेला आहे. परंतु, मध्यंतरी झालेल्या पावसामुळे कांद्याची रोपे सडून गेल्याचे रोपांचे बाजारभाव देखील वाढलेले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT