Khandesh Onion Cultivation : खानदेशात कांदा रोपवाटिका निर्मितीची तयारी वेगात

Khandesh Onion Nursery : खानदेशात आगाप रब्बी किंवा उन्हाळ कांदा लागवडीची तयारी तापी, गिरणा, अनेर पट्ट्यात सुरू झाली आहे.
Onion Cultivation
Onion Cultivation Agrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात आगाप रब्बी किंवा उन्हाळ कांदा लागवडीची तयारी तापी, गिरणा, अनेर पट्ट्यात सुरू झाली आहे. यंदा लागवड काहीशी वाढेल किंवा स्थिर राहील, असे चित्र आहे. खानदेशात रब्बीतील कांद्याची लागवड १० ते ११ हजार हेक्टरवर अपेक्षित आहे. यंदा ही लागवड मुबलक जलसाठ्यांच्या भागात काहीशी वाढेल.

तर दुष्काळप्रवण क्षेत्रात लागवड कमी होईल, अशी स्थिती आहे. परंतु एकूण लागवड वाढू शकते, असाही अंदाज आहे. धुळे, शिंदखेडा भागात लागवड वाढेल. धुळ्यातील साक्रीत लागवड स्थिर राहील. धुळे जिल्ह्यात या हंगामातील कांद्याची पाच ते सहा हजार हेक्टरवर लागवड केली जाते. एकट्या साक्री तालुक्यातील लागवड सुमारे तीन ते साडेतीन हजार हेक्टरवर असते.

Onion Cultivation
Onion Cultivation : रब्बी कांदा लागवडीसाठी रोपे निर्मितीची लगबग

जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, चाळीसगाव, धरणगाव, जामनेर या भागात कांदा लागवड वाढू शकते. तर नंदुरबारातील शहादा, नवापूर, नंदुरबार भागात कांदा लागवड किंचीत वाढेल. एकूण लागवड यंदा १० ते ११ हेक्टरवर पोचू शकते.

कांद्याचे दर सध्या स्थिर आहेत. काही शेतकऱ्यांना चांगले उत्पादन आले. तसेच दरही चाांगले मिळाले. अन्य पिकात नुकसान येत असल्याने अनेक शेतकरी त्या पिकांची लागवड कमी करून त्यात कांदा पीक घेण्याची तयारी करीत आहेत.

कांदा लागवडीसाठी बियाणे खरेदी सुरू आहे. अनेकांनी कृषी केंद्रांतून बियाणे खरेदी केले आहे. तर काही शेतकऱ्यांनी आपल्या परिसरातील शेतकऱ्यांकडून कांदा बियाणे खरेदी केले आहे. कांदा लागवड वाढू शकते, यामुळे पुढे कांदा रोपांचे दरही अधिक असतील. यामुळे लागवडीचे नियोजन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपापल्या कांदा रोपवाटिका निर्मितीवर भर दिला आहे.

Onion Cultivation
Onion Cultivation : कांद्यासाठी बियाणे टाकण्याची लगबग

अनेकांनी व्यावसायिक रोपवाटिका तयार केल्या असून, त्यातील रोपांची विक्री केली जाईल. कांदा रोपवाटिका जळगावातील धरणगाव, चोपडा, यावल, धुळ्यातील साक्री, धुळे, नंदुरबारातील शहादा भागात तयार करण्यास या आठवड्यात सुरवात झाली आहे. यंदा किमान १६० ते १८० हेक्टरवर कांदा रोपवाटिका खानदेशात राहतील, असाही अंदाज आहे.

ठिबक, मिनी स्प्रींकलरचा उपयोग

कांदा रोपवाटिकांची निर्मिती सुरू झाली आहे. शेतकरी याच आठवड्यात रोपवाटिकांत बियाणे पेरणीचे नियोजन करीत आहेत. थंडी येण्यापूर्वी रोप तरारल्यास पुढे त्याची वाढ चांगली होईल. करपा व अन्य रोगांनी नुकसान फारसे होत नाही, असे शेतकरी मानतात. तसेच लागवडदेखील आगाप करता येईल. रोपवाटिकांमध्ये ठिबक, मिनी स्प्रींकलरच्या मदतीने सिंचन केले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com