E Nam Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Products : शेतीमाल खरेदी-विक्रीत ‘ई-नाम’मुळे पारदर्शकता

Ministry of Agriculture Kisan Development, Government of India : केंद्र शासनाच्या नवीन धोरणानुसार ई-नाम (राष्ट्रीय कृषी बाजार) या नवीन प्रणालीमुळे शेतकऱ्यांचा अधिक फायदा होणार असून व्यवहारातील पारदर्शकता वाढणार

Team Agrowon

Nashik News : केंद्र शासनाच्या नवीन धोरणानुसार ई-नाम (राष्ट्रीय कृषी बाजार) या नवीन प्रणालीमुळे शेतकऱ्यांचा अधिक फायदा होणार असून व्यवहारातील पारदर्शकता वाढणार असल्याचे प्रतिपादन भारत सरकार कृषी किसान विकास मंत्रालयाचे नियुक्त मार्गदर्शक रंगनाथ कटरे यांनी केले.

केंद्र शासनाच्या नवनवीन धोरणांनुसार ई-नाम (राष्ट्रीय कृषी बाजार) योजनेबाबत संबंधितांना माहिती मिळण्यासाठी सोमवारी (ता. १२)सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात मार्गदर्शनपर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रणालीअंतर्गत सिन्नर बाजार समितीचा समावेश झाला असून याबाबतचे मार्गदर्शन कटरे यांनी केले. याप्रसंगी बाजार समितीचे सभापती शशिकांत गाडे, संचालक श्रीकृष्ण घुमरे, जालिंदर थोरात, सुनील चकोर, सचिव विजय विखे, तसेच शेतकरी, व्यापारी, मापारी व कर्मचारी उपस्थित होते.

कटरे यांनी शेतीमालास योग्य भाव, शेतीमालाचे वर्गीकरण (ग्रेडिंग), योग्य हाताळणी, मालाचे योग्य वजन व विक्री झालेल्या मालाचे या योजनेअंतर्गत राज्यातील इतर बाजार समितीमध्ये नोंद असणाऱ्या खरेदीदार व्यापाऱ्यांना बोली लावणे शक्य होणार आहे. त्यामुळे स्पर्धा निर्माण होऊन चांगला दर मिळवता येणार आहे.

भविष्यात गावांतील शेतमालास राष्ट्रीय स्तरावर देखील बाजारपेठ उपलब्ध होणार असून यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार असून शेतकऱ्यांना देय असणाऱ्या रकमाबाबत अधिक सुरक्षितता निर्माण होणार आहे. या योजनेतील लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-नामसाठी बाजार समितीकडे नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणीसाठी आधारकार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स, मोबाइल नंबर अनिवार्य आहे.

समितीचे सभापती व सचिव यांनी उपस्थित संबंधितांना या प्रसंगी संबोधित केले. केंद्र शासनाचे ई-नाम योजनेचा शेतकरी व व्यापारी घटकांना फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना अचूक वजन, योग्य दर व ऑनलाइन पेमेंट मिळणार आहे. सिन्नर बाजार समिती ई-नाम १०० टक्के प्रभावीपणे राबविण्यासाठी कटिबद्ध आहे.

ई-नामअंतर्गत बाजार आवारात होणारी धान्यभुसार शेतीमालाच्या लिलावाची प्रक्रिया सर्वप्रथम ई-नाम प्रकियेद्वारे राबविण्यात येणार आहे. यासाठी बाजार समितीने एकूण १३५ व्यापाऱ्यांचा ई-नाममध्ये समावेश केला असून ई-नाममध्ये एकूण ६५० शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. लवकरच ई-नामद्वारे सिन्नर मुख्य बाजार आवारातून खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू करण्यात येणार आहेl.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT