E-Nam Application: ई-नाम ॲपवरून शेतीमालाची खरेदी विक्री कशी करायची?

National Agriculture Market : शेतकऱ्यांच्या मालाला किफायतशीर दर मिळावा यासाठी केंद्र सरकारने २०१७ साली ई-नाम ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला. ई-नाम म्हणजे राष्ट्रीय कृषी बाजार.
National Agriculture Market
National Agriculture MarketAgrowon

E-Nam App Update : शेतकऱ्यांच्या मालाला किफायतशीर दर मिळावा यासाठी केंद्र सरकारने २०१७ साली ई-नाम ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला. ई-नाम म्हणजे राष्ट्रीय कृषी बाजार. एक देश एक व्यापार या संकल्पनेवर आधारित ई-नाम सुविधा आहे. देशातील शेतकऱ्याना हवा त्या बाजारपेठेत शेतीमाल विकण्याचं स्वातंत्र्य ई-नामचं उद्दिष्ट आहे.

त्यासाठी शेतकरी आणि व्यापारी यांच्यातील व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी ई-नामची यंत्रणा काम करते. ई-नामची enaam.gov.in ही अधिकृत वेबसाईट आहे.

या वेबसाईटवरून तुम्ही तुमच्या जवळच्या बाजारातील शेतीमालाचे भाव पाहू शकता. तसेच शेतीमालाची खरेदी-विक्री करू शकता.

एकूणच काय तर शेतीमालाचे ऑनलाइन पद्धतीनं व्यवहार ई-नामच्या माध्यमातून करता येतात. हेच व्यवहार अधिक सोप्या पद्धतीनं करण्यासाठी २०२२ मध्ये ई-नाम या अँप लॉन्च केलं आहे. त्यामुळे तुम्ही मोबाईलवरून या अँपच्या मदतीने माहिती घेऊ शकता आणि खरेदी-विक्रीचे व्यवहारही करू शकता.

National Agriculture Market
Agriculture App : स्मार्ट शेतीसाठी कोणकोणते ॲप्स आहेत महत्त्वाची?

१) ई नाम डाउनलोड कसं करायचं?

ई नाम गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. त्यासाठी तुमच्या मोबाईलमधील प्ले स्टोअर ओपन करावं लागेल. पुढे सर्चवर क्लिक करून e nam असं इंग्रजीत टाईप करायचं आहे. त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर काही अँपची लिस्ट येईल. त्यातील लोगो पाहून अधिकृत अँपच डाउनलोड करायचं आहे. तुम्हाला ते स्क्रीनवर दिसतं. ते डाउनलोड करायचं.

२) ॲपवर नोंदणी कशी करायची?

ॲप डाउनलोड केल्यानंतर ॲप ओपन करायचं. भाषा निवडण्याचा पर्याय दिसतो. त्यातून मराठी किंवा तुमच्या सोयीनुसार भाषा निवडू शकता. मराठी भाषा निवडल्यानंतर 'अंतिम वापरकर्ता परवाना करार' अशी सूचना दिसेल. स्क्रीनच्या खालील बाजूस डाव्या कोपऱ्यात चौकटीत क्लिक करून उजव्या बाजूला स्वीकार करा या पर्यायावर क्लिक करायचं.

त्यानंतर स्क्रीनवर शेतकरी, खरेदीदार, मंडी, पीक, भाव, नोंदणी अशी चार पर्याय दिसतात. नोंदणी पर्यायावर क्लिक केल्यानंतर त्यामध्ये शेतकऱ्याला संपूर्ण माहिती भरून जसं की, नाव, पत्ता, खाते क्रमांक, आधार कार्ड क्रमांक, मोबाइल क्रमांकाची माहिती द्यावी लागते.

माहिती भरल्यानंतर सबमिटवर क्लिक केल्यास तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होते. त्यानंतर तुम्ही अॅपवरून विविध खरेदी-विक्रीपासून ते विविध बाजारातील भाव आणि मालाची आवक पाहू शकता.

National Agriculture Market
Phule Baliraja App : विद्यापीठाचे फुले बळीराजा ॲप देणार शेतकऱ्यांना सल्ला

३) ई-नाम ॲपचा फायदा काय?

ई-नाम वरून शेतकरी १०० किलोमीटरच्या आतील बाजारातील शेतीमालाचे भाव पाहू शकतात. तसेच शेतकरी सोयीनुसार शेतीमालाची विक्रीही करू शकतात. तसेच हवामान अंदाज पाहू शकतात. आणि जवळच्या गोदामांची संपूर्ण माहिती देखील घेऊ शकतात. विशेष म्हणजे शेतीमालाला दिला जाणाऱ्या भावाविषयी शेतकऱ्याला माहिती घेता येते.

शेतीमालाची किंमत कशी ठरवली? याचं पॅरामिटर्स या ॲपमधून कळतात. उदा. सोयाबीन पीक घेऊया. तुम्ही सोयाबीनची विक्री ई-नाममधून केली त्यामध्ये ओलावा, काडीकचरा, मातीचे कण, बारीक खडे आदीचं प्रमाण किती आहे? यावरून भाव ठरवला जातो.

तसेच शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना शेतीमाल विकताच एकरकमी पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे बंधनकारक आहे. त्यामुळे व्यवहारात पारदर्शकता राहते.

४) विक्री कशी करायची?

तुम्ही नोंदणी करून ॲप ओपन केल्यास तुमच्या १०० किलोमीटर अंतरातील बाजारपेठाची नावे येतात. त्यातील एक निवडल्यानंतर त्या बाजारपेठेतील खरेदीदारांचे नाव दिसतात. तुम्ही शेतीमालाची विक्री करणाऱ्या खरेदीदाराचं नाव निवडून विक्री करू शकता.

दरम्यान, सध्या १८ राज्य आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण १२६० बाजारपेठा ई-नामशी जोडलेल्या आहेत. तसेच सुरुवातीला २५ शेतीमालाची खरेदी-विक्री ई-नाममधून करण्यात येत होती. आता त्यांची संख्या १७३ पर्यंत गेली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com