MAIDC
MAIDC Agrowon
ॲग्रो विशेष

MAIDC : ‘कृषिउद्योग’मधील क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्याही बदल्या

मनोज कापडे

Pune News : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना दुसरीकडे महाराष्ट्र कृषिउद्योग विकास महामंडळातील २५ क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या हाती बदल्यांचे आदेश मिळाले आहेत. विशेष म्हणजे निवृत्ती काही दिवसांवर आलेल्या अधिकाऱ्यांनाही हलविण्यात आले आहे.

‘कृषिउद्योग’च्या मुख्यालयातील वरिष्ठांना यापूर्वीच मुंबईतून बाहेर काढण्यासाठी जिल्हास्तरावर पाठविण्यात आले आहे. आता त्यापाठोपाठ क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्या आहेत.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, बदल्यांचे आदेश यापूर्वी ई-मेलने पाठवले जायचे. परंतु आचारसंहितेची अडचण भासू नये म्हणून मागच्या तारखा टाकून कुरिअरने बदल्यांचे आदेशपत्रे पाठविली गेली आहेत. बदल्यांचा खरा पत्रव्यवहार २९ मार्चला झालेला असला, तरी मूळ आदेशावर १३ मार्च २०२४ अशी तारीख नमूद करण्यात आली आहे.

निवडणूक आचारसंहितेच्या काळात बदल्यांचे आदेश दिल्यामुळे अधिकाऱ्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे. या बदल्यांमध्ये १२ प्रशासकीय कारणास्तव, तर १३ विनंती बदल्यांचा समावेश आहे.

प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, राज्य शासनाच्या बदलीविषयक कायद्याच्या कोणत्याही तरतुदींचा भंग न होता या बदल्यात करण्यात आलेल्या आहेत. आचारसंहितेचा व बदल्यांचा काहीही संबंध नाही. वर्षानुवर्षे एकाच खुर्चीला चिकटून बसलेल्या काही अधिकाऱ्यांना बदल्यांची प्रक्रिया आवडलेली नाही. त्यामुळे उगाच वाद तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मुंबईत बसून उंटावरचे दीड शहाणे ‘कृषिउद्योग’ला खिळखिळे करीत आहेत, अशी टीका एका क्षेत्रिय अधिकाऱ्याने व्यक्त केली. वरिष्ठ अधिकारी दिलीप झेंडे गेली आठ वर्षे पुण्याचे विभागीय व्यवस्थापकपद सांभाळत होते. त्यांना निवृत्त होण्यास तीन महिने उरलेले असताना आता त्यांना हटविण्यात आले आहे. त्यांना पुन्हा साताऱ्याचे जिल्हा प्रभारी करण्यात आले आहे.

कोल्हापूरचे विभागीय व्यवस्थापक राजेंद्र पाटील हेदेखील लवकरच निवृत्त होणार आहेत. त्यांनाही हटविण्यात आले आहे. “काही अधिकारी ‘कृषिउद्योग’मध्ये ३०-४० वर्षांपासून सेवा करीत आहेत. त्यांना निवृत्तीपूर्वी हटवून नव्याने आलेल्या कमी अनुभवी अधिकाऱ्याच्या खाली काम करण्यास सांगणे म्हणजे अधिकाऱ्यांचे नैतिक खच्चीकरण आहे,” अशा शब्दांत एका अधिकाऱ्याने नाराजी व्यक्त केली.

‘कृषिउद्योग’मधील बदल्या झालेल्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नावे (कंसात बदलीचे ठिकाण) ः

विभागीय व्यवस्थापक, पुणे, दिलीप झेंडे (सातारा, जिल्हा प्रभारी), विभागीय व्यवस्थापक, कोल्हापूर, राजेंद्र पाटील (कोल्हापूर, जिल्हा प्रभारी), विभागीय व्यवस्थापक, नाशिक, आर. एस. पाटील (छत्रपती संभाजीनगर, विभागीय व्यवस्थापक), विभागीय व्यवस्थापक, नाशिक, आर. डी. चव्हाण (कोल्हापूर, विभागीय व्यवस्थापक), व्यवस्थापक एस. एम. जोंधळे (पुणे, विभागीय व्यवस्थापक), जिल्हा प्रभारी, नाशिक, वाय. पी. बिडवे (नाशिक, विभागीय व्यवस्थापक), जिल्हा प्रभारी, छत्रपती संभाजीनगर, व्ही. के. फल्ले (चंद्रपूर, विभागीय व्यवस्थापक),

जिल्हा प्रभारी, सातारा व पुणे, आर. व्ही. पवळे (नगर, जिल्हा प्रभारी), जिल्हा प्रभारी, कोल्हापूर, योगेश खोत (छत्रपती संभाजीनगर, जिल्हा प्रभारी), जिल्हा प्रभारी, नगर, एस. एस. सूर्यवंशी (पुणे, जिल्हा प्रभारी), जिल्हा प्रभारी, नगर, पी. आर. जाधव (सोलापूर, जिल्हा प्रभारी), जिल्हा प्रभारी, अकोला, व्ही. व्ही. ठाकरे (अमरावती, जिल्हा प्रभारी), जिल्हा प्रभारी, एस. एस. कातखेडे (सोलापूर, जिल्हा प्रभारी), जिल्हा प्रभारी, व्ही. सी. जगदाळे (कोल्हापूर, जिल्हा प्रभारी),

जिल्हा प्रभारी, गोंदिया व भंडारा, व्ही. बी. केवट (चंद्रपूर, जिल्हा प्रभारी), जिल्हा प्रभारी, अमरावती, एस. एस. विरखरे (नागपूर, जिल्हा प्रभारी), जिल्हा प्रभारी, लातूर, के. यू. बनसोडे (नांदेड व परभणी, जिल्हा प्रभारी), जिल्हा प्रभारी, सोलापूर, एस. एस. पाटील (सांगली, जिल्हा प्रभारी), जिल्हा प्रभारी, चंद्रपूर, जी. एस. काळसकर (बुलडाणा, जिल्हा प्रभारी), जिल्हा प्रभारी, नंदुरबार, नीलेश पाटील (अकोला, जिल्हा प्रभारी), व्यवस्थापक,

नोगा, मुंबई, भरत जाधव (नाशिक, जिल्हा प्रभारी), उपव्यवस्थापक, नोगा, नागपूर, आर. एस. अरबड (मुंबई, नोगा, उपव्यवस्थापक), व्यवस्थापक, खत कारखाना, जालना, ए. डब्ल्यू. वाघमोडे (कोल्हापूर, खत कारखाना, व्यवस्थापक), व्यवस्थापक, खत कारखाना, कोल्हापूर, आर. एस. कदम (नांदेड, व्यवस्थापक), उपव्यवस्थापक, खत कारखाना, नांदेड पी. एम. सूर्यवंशी (जालना, खत कारखाना, व्यवस्थापक).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cibil Score : शेतकऱ्यांचा सीबिल स्कोअर कमी का असतो ?

Agriculture Crop Loan : पीककर्ज वाटपात बँकांचा हात आखडताच

Tea Crop Production : भारतात चहा पीक उत्पादनात घट, दर वाढण्याची शक्यता

Uddhav Thackeray : थापा, घोषणा खूप झाल्या आता कर्जमुक्ती करा; उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका

Sheshshayi Vishnu Murti : शेषशायी विष्णू मूर्ती सिंदखेडराजामध्येच राहणार

SCROLL FOR NEXT