Trade Agreements Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Trade Dispute: शेती, डेअरीवरून अडला व्यापार करार

Agricultural Trade Barrier: भारत-अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात असताना शेती व डेअरीसंबंधी मुद्द्यांवर मतभेद तीव्र झाले आहेत. अमेरिकेच्या GM (जिनसदोष) मका आणि सोयाबीनच्या आयातीवर भारताने शेतकऱ्यांच्या हिताचे कारण देत ठाम नकार दिल्यामुळे करार अडकला आहे.

Team Agrowon

Pune News: भारताने अमेरिकेचा शेतीमाल आणि डेअरी उत्पादनांच्या आयातीवरील शुल्क कमी करावे, जीएम पिकांची आयात करावी यावर अमेरिका अडून आहे. तर शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी भारताने या मागण्या मान्य केलेल्या नाहीत. त्यामुळे शेती आणि डेअरीवरून द्विपक्षीय व्यापार करार अडला आहे.

अर्थात, अनेक देशांसोबत अमेरिकेचा करार होणे अजून बाकी आहे. त्यामुळे जशास जसे शुल्क लागू झाले तरी भारताला फार फटका बसणार नाही. त्यामुळे शेती आणि डेअरीविषयी भारत घाईघाईत निर्णय घेणार नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जशास तसे शुल्क धोरणामुळे अमेरिका आणि भारत यांच्यात सध्या द्विपक्षीय करारासाठी चर्चा सुरू आहे. दोन्ही देशांच्या वतीने व्यापार करार अंतिम टप्प्यात नेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र घोडे अडले आहे ते शेती आणि डेअरी क्षेत्राशी संबंधित मुद्यांवर. भारतासोबतच्या शेतीमाल व्यापाऱ्यात तूट आहे.

भारत जास्त शुल्क आकारत असल्याने आयात शुल्क कमी करावे, अशी मागणी लावून धरली आहे. तर भारत आपल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी अमेरिकेची ही मागणी मान्य करताना दिसत नाही. अमेरिकेला आपले जीएम सोयाबीन आणि मका भारताच्या बाजारात उतरवायचे आहे. त्यासाठी अमेरिकेने सुरुवातीपासूनच आग्रह धरला आहे.

परंतु भारतात जीएम मका आणि सोयाबीन लागवड, वापरासाठी परवानगी नाही. भारताने ही परवानगी द्यावी. आयात शुल्क कमी करावे, अशी मागणी अमेरिका करत आहे. तसेच भारताने अमेरिकेच्या इतर शेतीमाल, डेअरी आयातीवरील शुल्क कमी करण्याची मागण आहे.

९ जुलैची मुदत, नंतर काय?

अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या शेतीमालासह इतर वस्तूंच्या आयातीवर २६ टक्के शुल्क लावले होते. त्यानंतर द्विपक्षीय करार करण्यासाठी ९ जुलैपर्यंत त्यास स्थगिती दिली. त्यामुळे सध्या १० टक्के आयात शुल्क लागू आहे. अमेरिकेने दबाव वाढवला आहे. मात्र, भारताने सावध भुमिका घेतली आहे.

९ जुलैपर्यंत करार पूर्ण झाला नाही तरी भारताला जास्त फटका बसणार नाही. कारण इतर देशांसोबतही अमेरिकेचा करार पूर्ण झालेला नाही. त्यामुळे केवळ भारतावरच नाही तर इतर देशांवरही शुल्क लागू होईल. या परिस्थितीत भारताला फायदाच होईल. त्यामुळे भारत शेती आणि डेअरीविषयी घाई करणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rainfall: नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीने दाणादाण 

Onion Farming: साताऱ्यात पावसाची कांदा रोपे निर्मितीत अडचण 

India Agriculture : शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालास योग्य भाव का मिळत नाही?; गडकरींनी सांगितलं खरं कारण

Ahilyanagar Rain: अहिल्यानगरच्या दक्षिणेत पावसाचा धुमाकूळ

Sports Experts: क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सूचना धोरणात परावर्तित होतील

SCROLL FOR NEXT