Food Contamination Agrowon
ॲग्रो विशेष

Food Safety : दूषित घटकांचे आरोग्यावर परिणाम

Food Contamination : पर्यावरणातील रसायनांमुळे होणारे प्रदूषणसुद्धा जागतिक अन्न सुरक्षेची एक प्रमुख समस्या आहे. मानवनिर्मित घनकचरा सुद्धा फार मोठी समस्या आहेत.

Team Agrowon

Global Food Security : आज जगभरामध्ये अन्न सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अन्नसाखळीतील विषारी घटकांचे मूल्यमापन केले जात आहे. प्रामुख्याने हे विषारी घटक अन्नसाखळीतील विविध स्तरांमध्ये पर्यावरणीय (नैसर्गिक तसेच मानवनिर्मित) स्रोतांमधून प्रसारित होत असतात. पर्यावरणातील रसायनांमुळे होणारे प्रदूषणसुद्धा जागतिक अन्न सुरक्षेची एक प्रमुख समस्या आहे. मानवनिर्मित घनकचरा सुद्धा फार मोठी समस्या आहेत. औद्योगिक रासायनिक सांडपाणीसुद्धा योग्य प्रक्रिया न करता जमीन किंवा पाण्याच्या स्रोतांमध्ये सोडल्यास जलप्रदूषण होऊन मानवीय आरोग्यास धोका निर्माण करू शकतात.

प्रदूषित हवेमधून सुद्धा अनेक रासायनिक विषारी घटक आरोग्यास धोका निर्माण करू शकतात. जगभरातील संशोधनाद्वारे असे लक्षात आले आहे,की कीटकनाशके, बुरशीनाशके, जड धातू, संप्रेरके, पशुवैद्यकीय औषधांचे रासायनिक विषारी घटक पाणी, वनस्पतिजन्य खाद्य पदार्थ (फळे, पालेभाज्या, कडधान्य इत्यादी), प्राणिजन्य खाद्य पदार्थ (दूध, अंडी, मांस, मासे इत्यादी), तसेच पाणी, मृदा आणि अनेक प्रकारच्या वनस्पती प्रामुख्याने पशुखाद्य आणि चारा यामध्ये यांपैकी काही रासायनिक विषारी अवशेष आढळून आले आहेत. त्यामुळे कृषी आणि पशुपालनाच्या दृष्टिकोनातून या संबंधित संभाव्य जोखमींचे मूल्यांकन करणे महत्त्वाचे आहे.

अन्न सुरक्षा आणि मानके

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या (FSSAI) संदर्भात, विषारी अवशेष म्हणजेच अन्नामध्ये हानिकारक पदार्थांचे प्रमाण, ज्यामध्ये कीटकनाशके, पशुवैद्यकीय औषधे आणि इतर दूषित पदार्थांचा समावेश आहे, जे सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त सेवन केल्यास आरोग्यास धोका निर्माण करू शकतात.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक मानके विकसित केली असून बऱ्याच खाद्यघटकांकरिता विषारी रासायनिक अवशेषांची मानवीय आहारातील आता जास्तीत जास्त परवानगी मर्यादा (एम आर एल) निश्चित केली आहे. सखोल माहितीसाठी Food Safety and Standards (Contaminants,Toxins and Residues) Regulations, २०११ आणि वेळोवेळी केलेल्या सुधारणा आपण भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण च्या संकेतस्थळावरून प्राप्त करू शकतो (https://www.fssai.gov.in/).

रासायनिक विषारी घटकांचा अभ्यास करताना दोन महत्त्वाच्या परिभाषा समजून घेणे सुद्धा अनिवार्य आहे. अन्न सुरक्षेच्या बाबतीत कमाल अवशेष मर्यादा (एमआरएल) आणि कमाल अनुज्ञेय पातळी (एमपीएल) समजाऊन घ्यावी. स्वीकार्य दैनिक सेवन (आयडीआय) म्हणजे एखाद्या पदार्थाचे अंदाजे प्रमाण जे आयुष्यभर दररोज सेवन केले जाऊ शकते आणि त्यामुळे आरोग्यास कोणताही मोठा धोका निर्माण होत नाही.

रासायनिक दूषित घटक

शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनांचे अवशेष पिके, फळे, भाज्या दूषित करू शकतात. शिसे, पारा, कॅडमिअम आणि आर्सेनिक दूषित माती, पाणी किंवा औद्योगिक प्रक्रियांद्वारे अन्नसाखळीत प्रवेश करू शकतात.

मायकोटॉक्सिन्स हे बुरशीद्वारे तयार केलेले विष आहेत, जसे की अफलाटॉक्सिन्स, जे धान्य, पशुखाद्य दूषित करू शकतात.

पशुपालनात वापरल्या जाणाऱ्या अँटिबायोटिक्स आणि औषधे मांस, दूध,अंड्यांमध्ये अवशेष टिकून रहातात.

हवा, माती आणि पाण्यात असलेले औद्योगिक आणि ग्राहक रसायने अन्न स्रोतांना दूषित करू शकतात.

प्रक्रिया दूषित घटक: अन्न प्रक्रियेदरम्यान काही रसायने तयार होऊ शकतात.

इतर रासायनिक दूषित घटक : नायट्रेट्स, मेलामाइन, परक्लोरेट आणि इतर रसायने अन्न दूषित करू शकतात.

जैविक दूषित घटक

साल्मोनेला, ई. कोलाय आणि लिस्टेरिया सारखे रोगजनक जिवाणू अन्न दूषित

करू शकतात, ज्यामुळे आजार होतात.

काही विषाणू अन्न दूषित करू शकतात, जसे की नोरोव्हायरस, हेपेटायटीस ए.

काही परजीवी, जसे की ट्रायचिनेला, टेनिय, डायफायलोबोथ्रियम, मांस आणि मासे दूषित करू शकतात.

बुरशी अन्न दूषित करू शकते, मायकोटॉक्सिनचे सेवन हानिकारक असू शकते.

भौतिक दूषित घटक

काच, धातू, प्लॅस्टिक किंवा इतर वस्तू चुकून अन्नात जाऊ शकतात.

केस अन्न तयार करताना किंवा हाताळताना दूषित करू शकतात.

माती आणि वाळू हे सुद्धा अन्न दूषित करू शकतात.

दूषिततेचे स्रोत

कीटकनाशके आणि तणनाशकांचा वापर, पशुपालन पद्धती आणि माती आणि पाण्याचे दूषितीकरण.

खाद्यपदार्थांची अयोग्य हाताळणी, अयोग्य साठवणूक आणि स्वच्छता पद्धतींमुळे सुद्धा दूषितता होऊ शकते.

औद्योगिक प्रदूषण, शेतीतील वाहून जाणारे पाणी, सांडपाणी, मानवनिर्मित कचरा आणि इतर स्रोत अन्न स्रोतांना दूषित करू शकतात.

पॅकेजिंगमधील रसायन अन्नात जाऊ शकते.

अयोग्य हाताळणी आणि साठवणुकीमुळे सुद्धा दूषित होऊ शकते.

मज्जासंस्थेसंबंधित विकार

अन्नधान्य, भाज्या आणि फळांमध्ये कीटकनाशकांचे अवशेष कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय केले जाऊ शकतात. त्यामध्ये प्रामुख्याने कीटकनाशकांचा तर्कसंगत वापर, कीटकनाशकांच्या तर्कसंगत वापरामध्ये योग्य कीटकनाशकांची निवड, प्रमाण दर, सौम्यीकरण, वापराची वेळ आणि वारंवारता, उपचारांचे अंतर आणि वापराची पद्धत, खबरदारी आणि मर्यादा यांचा समावेश असणे अनिवार्य आहे.

पशुवैद्यकीय औषधांचे अवशेष दुधात येऊ नये यासाठी योग्य रोगनिदान करून योग्य पशुवैद्यकीय उपचारपद्धतीचा वापर करणे तसेच अँटिबायोटिक उपचार सुरु असलेल्या दुधाळ प्राण्यांचे दूध सेवन न करणे गरजेचे आहे.

घनकचऱ्यापासून होणारे प्रदूषण टाळणे आणि प्रदूषण नियंत्रणासाठी हरित तंत्रज्ञानाचा उपयोग उदा. अक्षय ऊर्जा स्रोत, शाश्वत वाहतूक, कचरा व्यवस्थापन आणि औद्योगिक उत्सर्जन नियंत्रण यासह अनेक उपायांचा समावेश करून पर्यावरणीय परिणाम कमी करणे आणि स्वच्छतेला प्रोत्साहन देणे जास्तीत जास्त गरजेचे आहे.

- डॉ.राहुल कोल्हे

९८६०१९६२०१

(प्राध्यापक,पशुवैद्यकीय सामूहिक स्वास्थ्य आणि रोगपरिस्थितिविज्ञान शास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ,जि.सातारा)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT