Food Security and Safety Protocols : अन्नसुरक्षा प्रणालीत मानकांचे पालन आवश्यक

Food Export : आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट शेती पद्धती (गॅप) व अन्नसुरक्षा या महत्त्वाच्या मानकांना विशेष प्राधान्य दिले जात आहे.
Food
FoodAgrowon
Published on
Updated on

Nashik News: आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट शेती पद्धती (गॅप) व अन्नसुरक्षा या महत्त्वाच्या मानकांना विशेष प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे शेतीमाल व अन्न उद्योगातील घटकांना अद्ययावत कामकाजासंबंधी तांत्रिक माहिती उपलब्ध होण्यासह जनजागृतीसाठी एसजीएस संस्तर्फे थे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थित तज्ज्ञांनी निर्यातदारांना अन्नसुरक्षा प्रणाली व मानकांचे पालन यासंबंधी सखोल माहितीदेत त्यातील बारकावे समजावून सांगितले.

एसजीएस या संस्तर्फे थे निर्यात उद्योगांचे संचालक व प्रतिनिधी यांची कार्यशाळा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी एसजीइस इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अमित ठक्कर होते. कामकाजातील सुधारणा, तांत्रिक निकष व सुधारणा याबाबत चर्चा झाली. या कार्यशाळेत आंतरराष्ट्रीय पातळीवरील कामकाजाची कार्यपद्धती व पुरवठा साखळीतील पारदर्शकता याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. अन्न उद्योगातील व्यावसायिक व उद्योजकांना अन्नसुरक्षा व्यवस्थापन प्रणालीमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे.

Food
Food security : गहू आणि अन्नसुरक्षा

त्यानुसार आंतरराष्ट्रीय पातळीवरील नियमक व मालकांचे पालन करण्यासाठी नवीन सुधारित कामकाज पद्धती व व्यावसायिक धोरणांची अंमबजावणी गरजेची आहे, त्याबाबत जनजागृती हा महत्त्वाचा टप्पा आहे, असे मत एसजीएस इंडियाचे बिझनेस ॲश्युरन्स संचालक नीलेश जाधव यांनी मांडले. कंपन्या व निर्यातदारांनी तांत्रिक कामकाज अभ्यासून स्पर्धात्मक बाजू मजबूत करण्यासाठी अन्नसुरक्षा गुणवत्ता व नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.

कृषी व अन्न विभागाचे राष्ट्रीय व्यवस्थापक नीरज पुरी, राष्ट्रीय व्यवस्थापक अन्न सेवा विभाग मयुरेश आपटे, प्रमाणीकरण प्रमुख अरूप जना, प्रमाणीकरण सल्लागार संदीप सोनकुळ, सेंद्रीय शेती सल्लागार शैलेंद्र सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com