Kolhapur Rain agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्याला वळवाचा तडाखा, पूर्व, दक्षिण भागात जोरदार पाऊस

Weather Update : यंदा महिन्यात ४ ते ५ वेळा वळीव पाऊस झाल्याने पिकांची वाढ मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

sandeep Shirguppe

Torrential Rain Kolhapur : मागच्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात विविध भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. दरम्यान जिल्ह्यात सर्वाधिक उस क्षेत्र असल्याने आडसाली आणि खोडवा ऊस पिकांना हा पाऊस पोषक असल्याचे बोलले जात आहे.

यंदा महिन्याभरात ४ ते ५ वेळा वळीव पाऊस झाल्याने पिकांची वाढ मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ, हातकणंगले आणि कागल तालुक्यात मध्यम ते जोरदार पाऊस झाला. शिरोळ तालुक्याला गुरुवारी (ता. १६) वळवाच्या पावसाने झोडपून काढले. उसासह सर्वच पिकांना पोषक असणाऱ्या पावसाने तालुक्यातील विविध गावांतील आठवडा बाजारात मात्र त्रेधातिरपीट उडविणारा ठरला. शहरातील वीजपुरवठा काही काळ खंडित करण्यात आला.

पावसाने वीटभट्टी मालकांचे नुकसान झाले, तर जयसिंगपूर शाहूनगर, उदगाव, कुरुंदवाड आठवडी बाजारातील जनजीवन काही काळ विस्कळीत झाल्याने दैना उडाली. गुरुवारी सकाळपासूनच हवेत मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवत होता. यामुळे अंगाची लाही लाही होऊन जीव कासावीस झाला होता. दुपारपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले तसेच ढगांचा गडगडाट सुरू होता.

अचानक आलेल्या पावसामुळे शिरोळ तालुक्यातील अनेक आठवडी बाजारातील व्यापारी भाजी विक्रेते यांची त्रेधातिरपट उडाली, तर खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची तारांबळ उडाली होती. अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांनी पावसापासून संरक्षण होण्याकरिता आडोसा शोधून त्या ठिकाणी थांबल्यामुळे रस्त्यावरील वाहनांची वर्दळ कमी झाली होती.

दरम्यान, कोल्हापूर शहरात दुपारी झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आज ताराबाई पार्क येथील महाराणी ताराबाई उद्यान परिसरात एका झाडाची मोठी फांदी रस्त्यात कोसळली. त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक मार्गात बदल केला. अग्‍निशमन दलाच्या जवानांनी तेथील फांदी बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली. याव्यतिरिक्त शहरात काहीही नुकसान झाले नसल्याचे अग्‍निशमन दलातून सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT