Kolhapur Farmer : खासगी सावकाराला कंटाळून शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, शिरोळ तालुक्यातील घटना

Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या काही वर्षात शेतीच्या उत्पन्नात घट होत असल्याने शेतकऱ्यांचे बजेट कोलमडत चालले आहे.
Kolhapur Farmer
Kolhapur Farmeragrowon

Kolhapur Shirol : खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून शेडशाळ (ता. शिरोळ) येथील भालचंद्र कल्लाप्पा तकडे (वय ४४) या शेतकऱ्याने शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. तशी चिट्ठी त्याने खिशात ठेवून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी संबंधित चिट्ठी जप्त केली आहे. याबाबतची वर्दी राकेश श्रीपाल जगनाडे यांनी कुरुंदवाड पोलिसांत दिली आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मृत भालचंद्र शेती करीत होता. परिसरातील काही सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते. त्या सावकारांकडून पैशाचा तगादा सुरू होता. त्यामुळे तो तणावाखाली होता. आज सकाळी तो जुगुळ रस्त्यावरील शेताकडे गेला होता. दुपारच्या सुमारास त्याने त्याच्याच शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान, त्याच्या खिश्यात चिठ्ठी सापडली असून, त्यामध्ये ५ सावकारांची नावे आहेत. त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यांच्या कर्जाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा मजकूर आहे.

नेमकी कर्ज गुलदस्त्यातच मृत भालचंद्र तकडे याच्या खिशात चिट्ठी सापडली असून त्यात पाच सावकारांचा उल्लेख आहे त्यांच्याकडून नेमकी किती कर्ज घेतली याचा उल्लेख नाही भालचंद्र याचे नेमके किती होते हे गुलदस्त्यातच आहे.

Kolhapur Farmer
Sugarcane Kolhapur : आंदोलन अंकुशने ठेवला साखर कारखान्यांच्या वजन काट्यांवर 'अंकुश', ७७ कोटींचा थेट फायदा

सावकारीच्या पाश आवळतोय

कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या काही वर्षात शेतीच्या उत्पन्नात घट होत असल्याने शेतकऱ्यांचे बजेट कोलमडत चालले आहे. मागच्या ५ वर्षात दोन वेळा महापूर आणि मागच्या वर्षी अचानक दुष्काळ पडल्याने शेतकऱ्यांची पिके वाळू लागली आहेत. तर सोसायटी आणि बँकांच्या कागदपत्रांच्या पुर्ततेसाठी पायऱ्या झिजवायला लागतात. म्हणून शेतकरी सावकारी कर्जाचा पर्याय निवडतात परंतु सावकारीचे कर्ज न परवडणारे त्रासदायक असल्याने शेतकरी त्रासाला कंटाळून आत्महत्येचा पर्याय निवडत असल्याचे चित्र आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com