Award Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Farming Award: उच्चांकी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान; ‘राष्ट्रऋषी नानाजी देशमुख पुरस्कार’ प्रदान!

Rashtrarishi Nanaji Deshmukh Award: दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्रात आयोजित मेळाव्यात उच्चांकी कापूस उत्पादकता मिळवलेल्या १३ शेतकऱ्यांना ‘राष्ट्रऋषी नानाजी देशमुख शेतकरी पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

Team Agrowon

Ambajogai News: दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्रात शेतकरी मेळावा नुकताच पार पडला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील उच्चांकी कापूस उत्पादकता मिळवलेल्या १३ महिला व पुरुष शेतकऱ्यांचा ‘राष्ट्रऋषी नानाजी देशमुख शेतकरी पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.अध्यक्ष म्हणून दीनदयाल शोध संस्थान प्रकल्प संचालक डॉ. उपेंद्र कुलकर्णी, तर उद्घाटक म्हणून बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची उपस्थिती होती.

सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूरचे वरिष्ठ मृदा शास्त्रज्ञ डॉ. अंगामूथु मनिकंदन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे, उद्योगवर्धिनी सोलापूरच्या चंद्रिका चव्हाण, कापूस तज्ञ दादा लाड, कृषी महाविद्यालय अंबाजोगाई सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. संजीव बंटेवाड तसेच कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. वसंत देशमुख यांची उपस्थिती होती.

प्रास्ताविक डॉ. देशमुख यांनी केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी साळवे म्हणाले, की महिलांना प्रक्रिया उद्योगासाठी सूक्ष्मअन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत ३५ टक्के अनुदान देण्यात येते आहे. महिलांना विविध प्रक्रिया उद्योग कौशल्याचे प्रशिक्षण देण्यासाठी आत्मा पुढाकार घेत आहे.

चंद्रिका चव्हाण म्हणाल्या, की महिलांनी सर्वप्रथम स्वतःची आर्थिक पत तयार केली पाहिजे. सृजनशक्ती केवळ महिलांमध्ये आहे. महिला कोणताही उद्योग नेटाने पुढे नेतात. कापूस तज्ज्ञ लाड म्हणाले, की कापूस शेतकऱ्यांना वरदान ठरणारे पीक आहे.

श्री. कुलकर्णी म्हणाले, की शेतकऱ्यांनी प्रयत्नपूर्वक उत्पादनाची पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न करावा. सूत्रसंचालन कृष्णा कर्डिले यांनी तर आभार प्रमोद रेणापूरकर यांनी मानले.

शेतकरी आणि शास्त्रज्ञांच्या परिश्रमातून कृषी क्षेत्रात आपल्या देशाने मोठी प्रगती साध्य केली आहे. पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी तंत्रज्ञान प्रसारात पुढाकार घ्यावा. त्यांची जबाबदारी वाढली आहे.
अविनाश पाठक, जिल्हाधिकारी
सघन कापूस लागवड तंत्रज्ञान अत्यंत सोपे आहे. हंगामाच्या सुरुवातीपासून नियोजन करून कापूस उत्पादनात मोठी वाढ मिळविता येते. कापूस पिकात एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
डॉ. अंगामूथु मनिकंदन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT