
Yavatmal News : चालू आर्थिक वर्षांपासून खरीप तसेच रब्बी हंगामातील पिकांना मिळणाऱ्या हेक्टरी कर्ज वाटपात वाढ करण्यात आली आहे. यासंदर्भातचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. यामध्ये कापूस पिकाला आता ८५ हजार, तर सोयाबीनला प्रती हेक्टरी ७५ हजार रुपयांपर्यंत पीककर्ज मिळणार आहे.
जिल्ह्यात नऊ लाख हेक्टरवर खरीप हंगामातील लागवड क्षेत्र आहे. यात सर्वाधिक पेरा कापूस, तर त्या खालोखाल सोयाबीन, तूर, ज्वारी, आदी पिकांचा समावेश आहे. खरीप हंगामात पीक लागवडीकरिता आवश्यक असलेले बी-बियाणे, खते, कीटकनाशकांची खरेदी शेतकऱ्यांना करावी लागते.
यासाठी शेतकऱ्यांना पीककर्जाशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँक वगळता उर्वरित सर्वच बँकासुद्धा पीककर्ज वाटप करताना आखूडता हात घेतात. विशेष म्हणजे शासनाने निर्धारित केल्यानुसार कर्ज वाटपसुद्धा केल्या जात नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे यंदा पीककर्ज वाटपाच्या रक्कमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये कापूस पिकाला प्रती हेक्टरी पूर्वी ६५ हजार रुपये पीककर्ज मिळत होते. आता मात्र, २० हजाराने वाढ करण्यात आली असून, ८५ हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे.
पीक पूर्वी आता
कापूस ६५००० ८५०००
सोयाबीन ५८००० ७५०००
तूर ५२००० ६५०००
ऊस १६५०० १८००००
मुग २८००० ३२०००
रब्बी ज्वारी ३६००० ५४०००
हरभरा ४५००० ६००००
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.