Paani Foundation Award : ‘पाणी फाउंडेशन’चा भाग्योदय शेतकरी गटाला पहिला पुरस्कार

Water Conservation : सत्यमेव जयते पाणी फाउंडेशन आयोजित ‘फार्मर कप स्पर्धा’ पुरस्कारांचे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलामधील बॅडमिंटन हॉल येथे रविवारी (ता. २३) वितरण करण्यात आले.
Paani Foundation Award
Paani Foundation AwardAgrowon
Published on
Updated on

Pune News : सत्यमेव जयते पाणी फाउंडेशन आयोजित ‘फार्मर कप स्पर्धा’ पुरस्कारांचे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलामधील बॅडमिंटन हॉल येथे रविवारी (ता. २३) वितरण करण्यात आले. राज्यातील विविध पिकांमध्ये काम करणारे शेतकरी, महिला गट, सामाजिक संस्था, कृषी विद्यापीठांचे शास्त्रज्ञ, कृषी विभागाचे अधिकारी यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या वेळी पहिला पुरस्कार तुरची (ता. तासगाव, जि. सांगली) येथील भाग्योदय शेतकरी गटाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते देण्यात आला. २५ लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

या वेळी पाणी फाउंडेशनचे प्रमुख आमिर खान, किरण राव, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, पद्मश्री पोपटराव पवार, सत्यजीत भटकळ, डॉ. अविनाश पोळ आदी उपस्थित होते. तर राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार पुरस्कार विभागून देण्यात आला. द्वितीय पुरस्कारासाठी १५ लाख रुपये अशी रक्कम होती. त्यांना प्रत्येकी ७ लाख ५० हजार रुपये व सन्मान चिन्हे असे देण्यात आले.

Paani Foundation Award
Water Storage : सातपुड्यातील प्रकल्पांतील जलसाठा घटला

यामध्ये साताऱ्यातील भोसरे (ता. खटाव) सरसेनापती प्रतापराव गुजर महिला शेतकरी गट, सोबलगाव (ता. खुलताबाद) उंच भरारी महिला शेतकरी गटा (तूर)चा समावेश आहे. तर तृतीय पुरस्कार हा विभागून देण्यात आला. दहा लाख रुपये अशी पुरस्काराची रक्कम होती. प्रत्येकी पाच लाख रुपये व सन्मान चिन्ह असा पुरस्कार देण्यात आले.

Paani Foundation Award
Water Conservation : शेतकऱ्यांसाठी जलसंधारण योजना राज्यात प्रभावीपणे राबविणार

यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील कवडा (ता.कळमनुरी) येथील जय बिरसा मुंडा शेतकरी गट, तर वाशीम नागीन (ता.मंगळूरपीर) माउली शेतकरी गटाला देण्यात आला. तर जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट पहिला महिला पुरस्कार चिंचोरी (ता. फुलंब्री) अन्नदाता महिला शेतकरी गट, सर्वोत्कृष्ट द्वितीय पुरस्कार महालकिन्होळा (ता. फुलंब्री) येथील जय मल्हार महिला शेतकरी गट, सर्वोत्कृष्ट तृतीय महिला गटांना पुरस्कार खरसोली (ता. नरखेड) जिजाऊ महिला गटाला देण्यात आला.

‘फार्मर कप २०२५’ स्पर्धेत राज्यातील चार हजार ३६० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यातील २९३ तालुक्यांतील विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. तर राज्यातील पुरस्कारासाठी २५ शेतकरी गटांची निवड करण्यात आली होती.

तसेच जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पुरस्कारांचे वितरण या वेळी करण्यात आले. यंदा महिलांच्या संख्येत वाढ झाली आहे. सन २०२२ मध्ये ४२ होते. तर २०२३ मध्ये ८६०, तर २०२४ मध्ये १९४८ महिला गट सहभागी झाले होते. गटशेतीमुळे ‘एसओपीएस’ची अंमलबजावणी करण्यात आली असून ८८ टक्के काम करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com