Tomato Rate agrowon
ॲग्रो विशेष

Tomato Rate : टोमॅटोचे दर घसरले; सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका

Tomato Prices Fall : फळ लागेपर्यंत केलेला खर्चही निघण्याची शाश्वती नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी टोमॕटोचे प्लॉट सोडून दिल्याचे पाहावयास मिळत आहे.

sandeep Shirguppe

Tomato Rate Sangli : टोमॅटोचे दर अचानक घसरल्याने सांगलीतील टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. फळ लागेपर्यंत केलेला खर्चही निघण्याची शाश्वती नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी टोमॕटोचे प्लॉट सोडून दिले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातही अशीच काहीशी परिस्थिती पहायला मिळत आहे. शेतात टोमॅटो तोडण्यासाठी आलेल्या मजुरांचा खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे.

यावर्षी अनुकूल हवामानामुळे कीड व रोगाचा प्रादुर्भाव कमी असल्याने सांगली परिसरातील फळपिके जोमात आहेत. मात्र सध्या टोमॅटोचा दर प्रतिकिलो १० ते १५ रुपयांपर्यंत घसरला आहे.

याबाबत टोमॅटो उत्पादक शेतकरी विजय होणमाने म्हणाले की प्रचंड कष्टातून आणि अवाढव्य आर्थिक गुंतवणूक करून शेतकरी फळभाज्या पिके घेतो. मात्र या पिकांना दर नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. शासनाने अशा पिकांसंदर्भात शाश्वत धोरण आखणे गरजेचे असल्याचे होणमाने म्हणाले.

टोमॅटो पिकासाठी फळ येईपर्यंत एकरी २ लाख रुपये खर्च होतात. किमान किफायतशिर दर मिळावा अशी अपेक्षा आहे. दर प्रचंड घसरल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. तोडणीचा खर्चही भागत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो प्लॉट सोडून दिले आहेत.

या पिकांसाठी किमान २० रुपये प्रतिकिलो दराची अपेक्षा फोल ठरल्याने टोमॕटो उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहे. टोमॅटो दर नसल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. लहरी हवामान, अशाश्वत बाजारभाव याचा फटका पुनश्चः इथल्या शेतकऱ्यांना बसला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Expressway: शेतकऱ्यांच्या संसारावर वरवंटा फिरवणारा शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही- राजू शेट्टी

Rohit Pawar On Ajit Pawar: '...तर अजितदादा मुख्यमंत्री झाले असते'; रोहित पवार विधानसभेत काय म्हणाले?

Maize Procurement: सांगोल्यात २१ हजार क्विंटल मका खरेदीविना पडून

Maharashtra Farmer Issues: पीक विमा, अतिवृष्टी सरकारसाठी अडचणीचे

Cotton Market Rate: जाणून घ्या; आजचे सोयाबीन, कापूस, पपई, मका आणि केळीचे बाजारभाव

SCROLL FOR NEXT