Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असलेल्या करमाडच्या उप बाजारात दर दिवशी आवक होणाऱ्या टोमॅटोला गत आठवडाभरात १४० ते ५५० रुपये प्रति कॅरेट दरम्यान दर मिळाल्याची माहिती उपबाजार समितीच्या वतीने देण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने गत काही वर्षापासून करमाड येथील उप बाजारात टोमॅटोची बाजारपेठ सुरू केली आहे. या टोमॅटो बाजारात जवळपास सात ते आठ व्यापारी दररोज टोमॅटोची खरेदी करतात.
दर दिवशी साधारणतः ७०० ते ८०० कॅरेट टोमॅटो लोड करून दहा ते पंधरा गाड्या टोमॅटो राजस्थान, छत्तीसगड, दिल्ली, चंदीगड आदी बाजारपेठेत खरेदी करणारे व्यापारी पाठवितात.
दर दिवशी साधारणतः भोकरदन, बदनापूर, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर आदी तालुक्यातून १७० ते २०० शेतकरी आपला टोमॅटो या उप बाजारात विक्रीसाठी घेऊन येतात.
उपबाजार समिती प्रशासनाच्या माहितीनुसार दर दिवशी साधारणतः १२ ते १७ हजार कॅरेट टोमॅटो या बाजारात खरेदी केला जातो. २० ते २५ किलो क्षमतेच्या कॅरेटमधून खरेदी केलेल्या टोमॅटोचे वजन केले जात असल्याची माहिती उपबाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.