Crop Insurance Toll Free Number Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : पीक विम्याची समस्या चुटकीत सुटणार ; शेतकऱ्यांसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

Toll Free Number for Crop Insurance : नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान पीकविमा योजना सुरू केली आहे. मात्र, रोगापेक्षा इलाज भयंकर अशी या योजनेची गत झाली आहे.

Team Agrowon

PM Crop Insurance Scheme : नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकदा पिकांचे नुकसान होते. अशावेळी पीकविमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही प्रमाणात नुकसान भरापाई मिळते. मात्र, प्रत्यक्षात नुकसान झाल्यानंतर विमा मिळविण्यासाठी अनेकदा शेतकऱ्यांना विमा कंपन्यांचे उंबरे झिझवावे लागतात.

ज्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. शेतकऱ्यांची हीच समस्या लक्षात घेवून केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय एक टोल फ्री क्रमांक जारी करणार आहे. या शेतकऱ्यांना पीकविम्याशी संबंधित समस्या सोडविण्यासाठी उपयोग होणार आहे.

अवकाळी पाऊस, गारपीट किंवा अतिवृष्टी या सारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला जातो. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान पीकविमा योजना सुरू केली आहे.

मात्र, रोगापेक्षा इलाज भयंकर अशी या योजनेची गत झाली आहे. संभाव्य आपत्तीपासून शेतकऱ्यांच्या पिकाला संरक्षण मिळावे, या हेतूने सुरू केलेल्या योजनेंतर्गत सुमारे ३७ कोटी शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.

टोल फ्री क्रमांक कधी सुरू होणार?

या योजनेंतर्गत पिकांचा विमा काढलेल्या शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान झाल्यानंतर विमा भरापाईची कधी मिळणार, किती मिळणार याबाबची माहिती देणारी कोणतीही व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे विमा भरपाईची वाट पाहण्याशिवाय शेतकऱ्यांकडे दुसरा पर्याय नसतो. त्यामुळेच केंद्र सरकारने येत्या आठवड्यात पीकविम्यासंबंधित समस्यांसाठी टोल फ्री क्रमांक जारी करणार आहे.

छत्तीसगडमध्ये पायलट प्रोजेक्ट

सध्या छत्तीसगडमध्ये याबाबतचा पायलट प्रोजेक्ट राबविण्यात आला असून तो यशस्वी झाला आहे. कृषी मंत्रालयाकडून १४४४७ हा टोल फ्री क्रमांक जारी करण्यात येईल. या टोल फ्रीवरून शेतकऱ्यांना पीकविम्याच्या दाव्यांची म्हणजेच क्लेमची माहिती मिळू शकणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांना या क्रमांकावरून पीकविम्यासंबंधी तक्रारही करता येणार आहे.

असे होणार समस्या निवारण

शेतकऱ्यांना पीकविम्यासंबंधी समस्येसाठी १४४४७ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करावा लागणार आहे. त्यानंतर त्यांनी काढलेल्या पिकविम्याची सर्व माहिती द्यावी लागेल. यानंतर शेतकऱ्याला तक्रारीचा क्रमांक (आयडी) दिला जाईल.

अशाप्रकारे त्यानंतर शेतकऱ्यांची तक्रार नोंदवून घेतली जाईल. तसा शेतकऱ्याला त्याच्या मोबाईलवर मेसेजही प्राप्त होईल. शेतकऱ्याला तक्रारीचा पाठपुराव्यासाठी दिलेला आयडी सांगावा लागेल. त्यानंतर त्याला त्याच्या पीकविम्यासंबंधित तक्रारीची सद्यस्थिती काय आहे याची माहिती मिळणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT