Advance Crop Insurance : सांगलीत ६१ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रिम पीकविमा जमा

Crop Compensation Update : अग्रिमचा पीकविमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे काम संथगतीनेच सुरू असून दुसरा टप्पा कधी जाहीर होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

Sangli News : खरीप हंगामात वेगवेगळ्या जिल्ह्यांत हवामानाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. जिल्ह्यातील ३ लाख ७७ हजार ७५८ शेतकऱ्यांनी एक रुपयात पीकविमा योजनेचा लाभ घेतला. पहिल्या टप्प्यात ९८ हजार ३७२ शेतकऱ्यांना अग्रिमचा पीकविमा मंजूर झाला आहे.

मात्र, ७६ हजार ८१३ शेतकऱ्यांची रक्कम संबंधित विभागाकडे प्राप्त झाली असून त्यापैकी ६१ हजार ८२० शेतकऱ्यांना १६ कोटी ७० लाख ८८ हजार रक्कम खात्यावर वर्ग केली आहे. मात्र, अग्रिमचा पीकविमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे काम संथगतीनेच सुरू असून दुसरा टप्पा कधी जाहीर होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Crop Insurance
Advance Crop Insurance : नांदेडला अग्रिम विमा वाटपाला गती

शासनाने एक रुपयात पीकविमा योजना सुरू केली. ३ लाख ७७ हजार ८४४ शेतकऱ्यांनी एक रुपयात पीकविमा योजनेचा लाभ घेतला असून जिल्ह्यातील १ लाख ९२ हजार ११ हेक्टरवरील पिकांना संरक्षण दिले. मात्र, जिल्ह्यात यंदा पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम पीकविमा देण्याबाबत जिल्हा स्तरावर बैठकही झाली.

दरम्यान, जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात ९८ हजार ३७२ शेतकऱ्यांना २२ कोटी ४ लाख अग्रिमचा पीकविमा मंजूर झाला आहे. त्यापैकी ७६ हजार ८१३ शेतकरी पात्र झाले आहेत. या शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी १९ कोटी ३७ लाख ९३ हजार रक्कम मंजूरही झाली आहे. ही रक्कम शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिली जाणार, असे जाहीर केले होते. परंतु दिवाळीत अग्रिम निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाला नाही.

Crop Insurance
Crop Insurance : आठ हजार शेतकरी विम्याच्या प्रतीक्षेत

दिवाळीनंतर तब्बल एका महिन्यानंतर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रिम पीकविमा वर्ग करण्याचे काम सुरू झाले. सध्या ६१ हजार ८२० शेतकऱ्यांच्या खात्यावर १६ कोटी ७० लाख ८८ हजार रक्कम वर्ग केली आहे. १४ हजार ९९३ शेतकऱ्यांच्या खात्यावर २ कोटी ६७ लाख ५ हजार रक्कम वर्ग करणे बाकी आहे. वास्तविक जिल्ह्यात ३ लाख ७७ हजार ८४४ शेतकऱ्यांनी पीकविमा भरला आहे.

पहिल्या टप्प्यात ९८ हजार ३७२ शेतकरी पात्र ठरले आहेत. आता दुसरा टप्पा कधी जाहीर होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.

७५ टक्क्यांपेक्षा जास्त पेरणी न झालेले पात्र शेतकरी संख्या १०७०७

संरक्षित रक्कम ५ कोटी ५७ लाख ३६ हजार

विमा दिलेले शेतकरी संख्या ८६३९

संरक्षित रक्कम ४ कोटी ६५ लाख ३ हजार

उर्वरित शेतकरी संख्या २०८६

संरक्षित रक्कम ९२ लाख ३३ हजार

हवामानातील प्रतिकूल परिस्थिती

पात्र शेतकरी संख्या ६६१०६

संरक्षित रक्कम १३ कोटी ८० लाख ६ हजार

विमा दिलेले शेतकरी संख्या ५३१८१

संरक्षित रक्कम १२ कोटी ०५ लाख ८५ हजार

उर्वरित शेतकरी संख्या १२९२५

संरक्षित रक्कम १ कोटी ७४ लाख ७२ हजार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com