Crop Insurance : केळी पीकविम्यासाठी शेतकरी आक्रमक

Banana Crop Insurance : संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात केळी असतानाही त्यांचे काहीएक म्हणणे विमा कंपनीने ऐकून घेतले नाही. तक्रारी स्वीकारल्या, पण त्यावर कार्यवाही केलेली नाही.
Banana crop insurance
Banana crop insuranceAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : जिल्ह्यात हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या अनेक केळी विमाधारक शेतकऱ्यांचा सहभाग चुकीची माहिती व सर्वेक्षण अहवालांच्या आधारावर रद्द केल्यासंबंधी जिल्ह्यातील विविध भागातील शेतकऱ्यांनी नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली.

यात शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन किंवा तीव्र भूमिका मागे घेतली. शेतकरी ठिय्या आंदोलन व प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आले होते.

हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत २०२२-२३ मध्ये सहभागी झालेल्या १० हजार ६०० केळी विमाधारक शेतकऱ्यांचा सहभाग एमआरसॅककडून प्राप्त झालेल्या चुकीच्या माहितीमुळे रद्द करण्यात आला.

Banana crop insurance
Banana Crop Insurance : केळी पीकविमा मिळेपर्यंत पुढाऱ्यांना ‘गावबंदी’

शेतात केळीची लागवड केलेली असताना आपण लागवड केलेली नाही, आपला विमा हप्ता जप्त केला जात आहे, अशा नोटिसा जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना देण्यात आल्या. संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात केळी असतानाही त्यांचे काहीएक म्हणणे विमा कंपनीने ऐकून घेतले नाही. तक्रारी स्वीकारल्या, पण त्यावर कार्यवाही केलेली नाही.

अनेकांना परतावे मिळाल्याचे संदेश आले, परंतु प्रत्यक्षात बँक खात्यात परतावाच जमा झालेला नाही, यंदाही किंवा २०२३-२४ च्या हंगामात केळी पिकासाठी विमा संरक्षण घेतलेल्या केळी विमाधारक शेतकऱ्यांच्या शेतातील केळी पिकाची पाहणी, पडताळणी विमा कंपनीने केलेली नाही.

२०२२-२३ या वर्षातही अनेक शेतकऱ्यांच्या केळी पिकाची पडताळणी योग्य न झाल्याने १० हजार ६०० शेतकऱ्यांचा सहभाग योजनेतून बेकायदेशीरपणे रद्द करण्यात आला. एमआरसॅकतर्फे सॅटेलाईट इमेज व इतर संस्थांकडून माहिती घेवून शेतकऱ्यांच्या शेतातील केळी पिकाची पडताळणी झाली. हा प्रकार खर्चीक असून, अतांत्रिक आहे. त्यातून चुकीची माहिती प्राप्त झाली व शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

Banana crop insurance
Banana Crop Insurance : केळीला पीक विमा नाही, पुढाऱ्यांना गावबंदी व मतदानावर बहिष्कार

शासनाच्या निधीचीही उधळपट्टी त्यात कृषी विभागाने केली, अशा तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या. यानंतर सर्व शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवानात एकत्र करण्यात आले. प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले व यासंबंधी योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.

यानंतर शेतकऱ्यांनी मवाळ भूमिका घेत आपले आंदोलन स्थगित केले. आंदोलनात महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे संदीप पाटील, किरण गुर्जर, शेतकरी डॉ.सत्वशील पाटील, भूषण पाटील व विविध भागातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com