Floriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Floriculture : नांदेडमधील फूल उत्पादकांना सुविधा पुरविणार

Flower Farming : दिवसेंदिवस फुलशेती करणाऱ्‍या शेतकऱ्‍यांचे प्रमाण वाढत आहे. फुलशेती करणाऱ्‍या शेतकऱ्यांनी संघटित होऊन शेती केली तर त्याचे मार्केटिंग करण्यास अतिशय सोपे होईल.

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस फुलशेती करणाऱ्‍या शेतकऱ्‍यांचे प्रमाण वाढत आहे. फुलशेती करणाऱ्‍या शेतकऱ्यांनी संघटित होऊन शेती केली तर त्याचे मार्केटिंग करण्यास अतिशय सोपे होईल. त्यासाठी आवश्यक सोयी सुविधा शेतकऱ्यांना पुरवल्या जातील. फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्‍यांनी भविष्यात समूह तयार केला जाईल व त्यामार्फत शेतकऱ्‍यांच्या समस्या सोडवण्यात येतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.

सहकार व पणन विभाग अंतर्गत आशिया विकास बँक अर्थसाहित महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय नांदेड व प्रकल्प संचालक (आत्मा) कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता. १९) एक दिवसीय फुलशेती उत्तम कृषी पद्धती या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

कार्यशाळेस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) भाऊसाहेब बऱ्हाटे, प्रकल्प उपसंचालक (मॅग्नेट) लातूर महादेव बरडे, विभागीय प्रकल्प अधिकारी (मॅग्नेट) लातूर गणेश पाटील, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे मनुष्यबळ विकास तथा वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी हेमंत जगताप, अक्षय हातागळे, उपविभागीय कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, राजकुमार रणवीर यांच्यासह जिल्ह्यातील फूल उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी एकत्रितरीत्या येऊन फक्त फुलशेतीसाठी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करावी असे सुचवले. महादेव बरडे यांनी मॅग्नेट प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली. हेमंत जगताप यांनी मॅग्नेट प्रकल्पाने महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाला नांदेड येथे फुलशेती पीक कार्यशाळा घेण्याची जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मॅग्नेट प्रकल्पातील अधिकाऱ्यांचे आभार मानले.

कार्यशाळेमध्ये खुल्या वातावरणातील फुलशेती लागवड याविषयी पुणे येथील पुष्प संशोधन निदेशालयाचे शास्त्रज्ञ डॉ. गणेश कदम यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. फुलपिकांची नियंत्रित वातावरणातील शेती याविषयी राजन निफाडकर यांनी माहिती दिली. फुलपिकांसाठी संरक्षित वातावरणातील तंत्रज्ञान याविषयी हेमंत जगताप यांनी मार्गदर्शन केले.

फुलपिकांचे मार्केटिंग तंत्रज्ञान याविषयी गणेश पाटील यांनी माहिती दिली. महिलांसाठी लैंगिक व सामाजिक विषमता याविषयी अक्षय हातागळे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे आयोजन मॅग्नेट प्रकल्प संचालक विनायक कोकरे, व्यवस्थापकीय संचालक एमसीडीसी मिलिंद आकरे, सहप्रकल्प संचालक मॅग्नेट डॉ. अमोल यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये नांदेड जिल्ह्यातील २२८ प्रगतशील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.

फुलांचा मूल्यवर्धन प्रकल्प हवा

कार्यशाळेस आलेले गुंडेगावचे शेतकरी दासराव हंबर्डे यांनी नांदेड जिल्ह्यात फुलांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते, परंतु त्यास भाव मिळत नाही. यामुळे या फुलांचे मूल्यवर्धन व्हावे, यासाठी नांदेडला प्रक्रिया उद्योग सुरु करावा. फुलउत्पादकांना बँका सहकार्य करत नाहीत. यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT