Baramati News: यंदा मे आणि जून महिन्यांत बारामती तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने जिरायती शेतकऱ्यांचा कडधान्य पिकांकडे मोठ्या प्रमाणात कल वाढला. खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये कडधान्य पेरणी क्षेत्रात ३२८.९० टक्के वाढ नोंदवली गेली आहे. मात्र, केंद्र सरकारच्या तूर, उडीद आणि मसूर यांच्यावरील शून्य आयात शुल्क धोरणामुळे व परदेशी कडधान्यांच्या आयातीमुळे देशांतर्गत बाजारभाव कमी राहण्याची भीती आहे. .यामुळे शेतकऱ्यांना खात्रीशीर उत्पन्न मिळेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.बारामती तालुक्यात यंदा कडधान्य पेरणीने विक्रमी वाढ दाखवली आहे. सरासरी ४२० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १३८१.४० हेक्टरवर पेरणी झाली आहे. यात उडीद पिकाने १३८८.३७ टक्के वाढीसह ५९७ हेक्टर क्षेत्र व्यापले आहे..Pulses Sowing : मुरूड तालुक्यात कडधान्य पेरणीची लगबग सुरू.तुरीची पेरणी ३५२.४० हेक्टर (४७६.२२ टक्के वाढ), मूग ३२४ हेक्टर (१७५.१४ टक्के वाढ), तर इतर कडधान्य १०८.० हेक्टर (९१.५३ टक्के) पेरले गेले आहे. कमी कालावधीची आणि कमी पाण्याची गरज असलेली कडधान्य पिके जिरायती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरतात, असे निरीक्षण तालुका कृषी विभागाने नोंदवले आहे. .Pulses Sowing : सांगलीत कडधान्य क्षेत्रात २३ हजार हेक्टरने घट.बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सध्या उडीदाला सरासरी ६५९० रुपये प्रति क्विंटल, तुरीला ५५०० रुपये आणि मुगाला ८००० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. परंतु, परदेशातून स्वस्त कडधान्य आयात होत असल्याने हे दर कमी होण्याचा धोका आहे.आयात शुल्काने नुकसान.कडधान्य पिके कमी कालावधीत तयार होतात, पण शून्य आयात शुल्कामुळे परदेशी कडधान्य स्वस्त दरात येत असल्याने स्थानिक शेतकऱ्यांना अपेक्षित नफा मिळणे कठीण आहे. केंद्र सरकारने तूर, उडीद आणि मसूर यांच्यावरील शून्य आयात शुल्क धोरण ३१ मार्च २०२५ आणि काही बाबतीत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवले आहे. यामुळे २०२४-२५ मध्ये भारताने ७.३४४ दशलक्ष टन कडधान्य आयात केले. यामुळे देशांतर्गत कडधान्यांचे भाव किमान आधारभूत किमतीखाली (एमएसपी) आले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होत आहे..एकरी उत्पादन आणि उत्पन्नउडीद : एकरी सरासरी ४ ते ५ क्विंटल उत्पादन, ६५९० रुपये प्रति क्विंटल दराने एकरी २६,३६० ते ३२,९५० रुपये उत्पन्न.तूर : एकरी सरासरी ५ ते ६ क्विंटल उत्पादन, ५५०० रुपये प्रति क्विंटल दराने एकरी २७,५०० ते ३३,००० रुपये उत्पन्न.मूग : एकरी सरासरी ३ ते ४ क्विंटल उत्पादन, ८००० रुपये प्रति क्विंटल दराने एकरी २४,००० ते ३२,००० रुपये उत्पन्न..बारामती तालुक्यामध्ये यंदा मे व जूनमध्ये पावसाची स्थिती समाधानकारक राहिली होती. परिणामी कडधान्याच्या पेरण्यांमध्ये आपल्याला वाढ दिसून येते. कमी कालावधीत खात्रीशीर उत्पादन म्हणून शेतकऱ्यांनी कडधान्याची पेरणी केल्याचे दिसून येते. - सचिन हाके, तालुका कृषी अधिकारी, बारामती.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.