Agriculture Drone Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Drone Training : ड्रोन प्रशिक्षण घेणाऱ्या शेतकऱ्यांना ‘आत्मा’च्या माध्यमातून मदत करू

Organic Farming : बीड जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यात येत आहे. सेंद्रिय शेतीच्या विविध निविष्ठा ड्रोनच्या माध्यमातून पिकाला देण्यासाठी फायदा होऊ शकतो.

Team Agrowon

Beed News : बीड जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यात येत आहे. सेंद्रिय शेतीच्या विविध निविष्ठा ड्रोनच्या माध्यमातून पिकाला देण्यासाठी फायदा होऊ शकतो. ड्रोन प्रशिक्षण घेणाऱ्या शेतकऱ्यांना आत्माच्या माध्यमातून मदत करू. त्यासाठी ग्रामीण भागातील तरुण शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे मत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांनी व्यक्त केले.

दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र अंबाजोगाई येथे कृषी ड्रोन पायलट कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून श्री. साळवे बोलत होते. डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ मुंबई येथील इनोव्हेशन इनक्युबेशन लिंकेज सेंटरचे संचालक डॉ. विशाल बाणेवार,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे येथील डॉ. ब्रिजेश अय्यर, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील डॉ. कबीर खराडे, छत्रपती संभाजीनगर येथील श्रेयश महाविद्यालयचे डॉ. जयंत महाजन, एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. संतोष कुलकर्णी, मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे कृषी अभियंता डॉ. सचिन शिंदे व केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. वसंत देशमुख यांची मंचावर उपस्थिती होती.

कार्यशाळेचे प्रास्ताविक करताना डॉ. देशमुख म्हणाले, की शेतकऱ्यांपुढे मनुष्यबळाची समस्या आहे. शेतीच्या विविध कामांसाठी ड्रोनचा वापर आवश्यक आहे. ड्रोनच्या माध्यमातून यांत्रिकीकरण व रोजगार निर्मिती करणे शक्य आहे. शेतकऱ्यांमध्ये ड्रोन तंत्रज्ञान विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ड्रोन तंत्राची मर्यादा केवळ पीक फवारणी पुरती न ठेवता विविध कृषी कामासाठी वापर शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. अंबाजोगाई, केज, परळी, धारूर, वडवणी व माजलगाव तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने कार्यशाळेला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कृषी अभियंता प्रमोद रेणापूरकर यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT