Organic Farming : सेंद्रिय शेतीसह जमिनीची वाढवली सुपीकता

Soil Fertility : सुमारे दहा वर्षांपासून करडा (जि. वाशीम) येथील गोविंद देशमुख यांनी सेंद्रिय पद्धतीवर अधिक भर देऊन हळद व हंगामी पिकांमध्ये त्या पध्दतीचे प्रयोग व व्यवस्थापन सुरू ठेवले आहे. दर्जेदार, आरोग्यदायी उत्पादन निर्मिती करण्यासह जमिनीचे आरोग्य व सुपीकताही त्यांनी वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.
Organic Farming
Organic FarmingAgrowon
Published on
Updated on

Success Story in Agriculture : करडा (ता. रिसोड, जि. वाशीम) येथील गोविंद प्रतापराव देशमुख यांची पाच एकर शेती आहे. त्यातील काही चुनखडीयुक्त आहे. दहा ते त्याहून अधिक वर्षांपूर्वी त्यांच्या शेतीत रासायनिक खते व कीडनाशके यांचा वापर अधिक होता. उत्पादन खर्चही वाढता होता. त्यावर उपाय शोधताना करडा कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) व तेथील उद्यानविद्या तज्ज्ञ निवृत्ती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रिय शेतीला सुरुवात केली.

सेंद्रिय शेती, पीकपद्धती व उत्पादन

मागील दहा वर्षांपासून देशमुख यांनी सेंद्रिय शेती पद्धतीवर भर देत प्रयत्नपूर्वक रासायनिक घटकांचा वापर कमी करीत आणला. आज दोन एकर हळद शेती ते शंभर टक्के सेंद्रिय पद्धतीने करतात. तर उर्वरित शेती सेंद्रिय अधिक रासायनिक अशी एकात्मिक पद्धतीची आहे. अलीकडील वर्षांत जमिनीचे आरोग्य व सुपीकता वाढवण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला आहे. जमीन भुसभुशीत झाली आहे.

त्यात गांडुळांची संख्या वाढली आहे. तीन एकरांत मागील वर्षी केसर आंब्याची रोपे लावली आहेत. त्यात सोयाबीन व तुरीचे आंतरपीक घेण्यात येत आहे. सोयाबीनचे एकरी सात ते ८ क्विंटल, हरभऱ्याचे जवळपास तेवढेच तर तुरीचे चार ते पाच क्विंटल उत्पादन मिळते. हळद हे देशमुख यांचे तसे मुख्य पीक आहे. सेलम वाणाचे सरासरी २५ क्विंटलपासून (वाळवलेले) ३० ते ३६ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळवण्यात त्यांनी हातखंडा तयार केला आहे.

आठ, नऊ वर्षांपासून ही उत्पादकता टिकवली आहे. शेतात सुमारे १५ वर्षे वयाचे देशी आंब्याचे झाड आहे. त्याच्यावर मधमाशीची सुमारे १२ ते १३ पोळी आहेत. मधमाश्‍यांच्या सहवासामुळे परपरागीभवन सहजपणे होऊ लागले आहे. आमच्या आंब्याचा स्वाद इतका दर्जेदार आहे की त्यास ग्राहकांकडून मोठी मागणी असते. परंतु तेवढा माल उपलब्ध होत नाही. परिसरात पक्षी, मित्रकीटक आढळत आहेत.

Organic Farming
Organic Farming : आरोग्यसंपन्न जीवनासाठी सेंद्रिय शेतीचे भागीदार व्हा

सेंद्रिय प्रयोग व व्यवस्थापन

हळदीबाबत प्रातिनिधिक सांगायचे तर ज्या शेतात हे पीक घेण्यात येते त्यात दरवर्षी रब्बीचे पीक काढून झाल्यानंतर धैंचा, बोरू आदी हिरवळीच्या पिकांची लागवड केली जाते. चाळीस दिवसांनंतर हे पीक जमिनीत गाडण्याची प्रक्रिया ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे केली जाते. दरवर्षी फेरपालट होईल यावर कटाक्ष असतो. हळदीत गांडूळ खत तसेच गुजरातहून आणलेल्या एका सेंद्रिय निविष्ठेचा वापर होतो.

बेण्यासही या निविष्ठेची व ट्रायकोडर्माची प्रक्रिया होते. सेंद्रिय निविष्ठा बाजारातून घेतल्या तर
खर्चात फारशी बचत होत नाही हे लक्षात आले. मग शेतातच निविष्ठा तयार करण्याचे तंत्र केव्हीकेच्या तज्ज्ञांच्या माध्यमातून शिकून घेतले.

गांडूळ खताचे दोन वाफे (बेड) कायमस्वरूपी कार्यरत असतात. त्यात वर्षाला दोन टनांपर्यंत निर्मिती होते. जिवामृत, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, कडधान्य स्लरी आदींची निर्मिती केली जाते. त्यासाठी वर्षभर १२ ते १३ टाक्या कायम भरलेल्या अवस्थेत असतात.

Organic Farming
Women Empowerment : बचत गटाच्या साथीने महिला झाल्या सक्षम

शेण, गोमूत्र उपलब्ध होण्यासाठी देशी गाय पाळली आहे. दर १५ दिवसांनी सुमारे सव्वा एकरासाठी पाचशे लिटरप्रमाणे वापर होतो. विविध जिवाणू असलेल्या कल्चरचाही दर पंधरा दिवसांनी एकरी एक हजार लिटर याप्रमाणे वापर होतो. दशपर्णी अर्कात कडुनिंब, करंज. टणटणी, गुळवेल, एरंड आदी दहा वनस्पतींच्या पाल्याची कुट्टी करून ५० किंवा १०० लिटर टाकीत द्रावण तयार केले जाते. त्याचा १० ते १२ दिवसांनी वापर होतो.

हळदीच्या पाल्याचे कंपोस्ट

शेतातील काडीकचरा, पिकांचे अवशेषही उपयोगात आणले जातात. देशमुख सांगतात, की
हळदीची काढणी झाल्यानंतर त्याचा शिल्लक राहिलेला पाला मजुरांकरवी काढून घेतो.
त्यावर जिवाणू कल्चरचा वापर करून ते चांगले कुजवतो. हे जमिनीला एक उत्तम सेंद्रिय खत म्हणून उपलब्ध होते.

सेंद्रिय हळद

देशमुख सांगतात, की हळदीला मागील दोन वर्षे प्रति क्विंटल पाच हजार ते सात हजारांपर्यंत दर मिळाला होता. यंदा मात्र तो १५ हजार रुपयांपर्यंत मिळतो आहे. शंभर टक्के सेंद्रिय हळदीचे उत्पादन घेतो. सध्या पावडर निर्मितीतून त्याचे मूल्यवर्धन केले आहे. सेंद्रिय शेतीचे वैयक्तिक प्रमाणपत्र ही खर्चिक बाब आहे.

सामुहिक प्रमाणपत्र घ्यायचे तरी सर्व शेतकऱ्यांचे संघटन होणे काही वेळा अशक्य असते अशी खंतही देशमुख व्यक्त करतात. वडील प्रतापराव यांच्या मार्गदर्शनातून व भाऊ व्यंकटेश यांच्या सहकार्याने देशमुख आपल्या शेतीची प्रगती साधताहेत. ट्रॅक्टर, घराचे बांधकाम व मुलांचे शिक्षण शेतीतून करणे शक्य झाल्याचे ते सांगतात.

गोविंद देशमुख, ९५५२३२७१९८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com