Paddy Variety Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Variety : कर्जतच्या प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातर्फे भाताचे तीन वाण विकसित

Rice Developed : कोकण संजय, कर्जत-१० आणि ट्रॉम्बे कोकण खारा या तीन विविध कालावधीच्या वैशिष्ट्यपूर्ण वाणांना राज्यस्तरीय वाण प्रसारण समितीने मान्यता दिली.

Team Agrowon

Karjat News : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जतच्या भात विशेषज्ञ डॉ. भरत वाघमोडे आणि त्यांच्या चमूने अथक प्रयत्नातून विकसित केलेल्या कोकण संजय, कर्जत-१० आणि ट्रॉम्बे कोकण खारा या तीन विविध कालावधीच्या वैशिष्ट्यपूर्ण वाणांना राज्यस्तरीय वाण प्रसारण समितीने मान्यता दिली.

त्यानंतर शुक्रवारी (ता. २) केंद्रीय वाण प्रसारण समितीनेही अधिघोषित केली. कोकणातील तसेच राज्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध गुण वैशिष्ट्ये असणाऱ्या या तिन्ही भात वाणांचे बियाणे पुढील हंगामापासून उपलब्ध करून देण्यात येतील, असे डॉ. भरत वाघमोडे यांनी सांगितले. ही तिन्ही वाणे भात पिकविणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरतील, असे मत विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी व्यक्त केले.

कोकण संजय : हे वाण निमगरवा (१२५ ते १३० दिवस ), लांबट बारीक दाण्याचा आणि ५० ते ५५ क्विंटल प्रतिहेक्टर उत्पादन देणारे आहे. प्रमुख कीड व रोगास मध्यम प्रतिकारक आहे. शिजवल्यानंतर तांदळाची गुणवत्ता उत्तम असून सदरचा वाण राज्यातील भात पिकविणाऱ्या विभागासाठी शिफारस करण्यात आला आहे.

कोकण-१० : हे वाण गरवा (१४० ते १४५ दिवस), ४५ ते ५५ क्विंटल प्रतिहेक्टरी उत्पादन देणारे आहे. हे वाण पाणथळ जमिनीसाठी शिफारस करण्यात आले आहे. प्रमुख कीड व रोगास मध्यम प्रतिकारक आहे. अख्ख्या तांदळाचे प्रमाण ६० टक्क्यांपेक्षा जास्त असून शिजवल्यानंतर भाताची गुणवत्ता उत्तम आहे.

ट्रॉम्बे कोकण खारा : हे वाण निमगरवा (१२५ ते १३० दिवस), लांबट बारीक दाण्याच्या प्रकारातील असून ४० ते ४५ क्विंटल प्रतिहेक्टर उत्पादन देणारे आहे. कोकण विभागातील क्षारपड जमिनीसाठी याची शिफारस करण्यात आली असून ६ ईसीपर्यंत क्षार सहन करणारा हे वाण आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soyabean Crop Damage: सोयाबीनवर कीटकनाशक फवारलं, सोयाबीन जळालं; केंद्रीय कृषिमंत्र्याचे कारवाईचे आदेश

Satara DCC Bank : सातारा जिल्हा बॅंकेची वार्षिक सभा खेळीमेळीत

Satara ZP Election : सातारा ‘झेडपी’साठी २६ लाख ६६ हजार मतदार

Rain Crop Damage : शेती पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; मदत व पुनर्वसन मंत्री जाधव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Crop Loss Compensation : भरपाईप्रश्‍नी जिल्हाधिकारी करणार हस्तक्षेप

SCROLL FOR NEXT