Maharashtra Drought Condition Agrowon
ॲग्रो विशेष

Jalna Drought Condition : जालना जिल्ह्यातील तीन तालुके दुष्काळातून वगळले

Marathwada Drought Update : जिल्ह्यात यंदा झालेल्या अल्प पावसामुळे दुष्काळाला तोंड देण्याची वेळ आली आहे. मात्र, राज्य शासनाकडून ऑनलाइन अहवालानुसार जिल्ह्यातील पाच तालुक्यांचाच दुष्काळी परिस्थितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

Team Agrowon

Jalana News : जिल्ह्यात यंदा झालेल्या अल्प पावसामुळे दुष्काळाला तोंड देण्याची वेळ आली आहे. मात्र, राज्य शासनाकडून ऑनलाइन अहवालानुसार जिल्ह्यातील पाच तालुक्यांचाच दुष्काळी परिस्थितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

तर जाफराबाद, परतूर आणि घनसावंगी या तीन तालुक्यांना वगळण्यात आले आहे. मात्र, प्राथमिकदृष्ट्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत दुष्काळी स्थिती दिसून येते. त्यामुळे दुष्काळी स्थितीमधून आउट केलेल्या या तीन तालुक्यांना पुन्हा दुष्काळी उपाययोजनांमध्ये समावेश करून घेणार की नाही? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

जिल्ह्यात जून महिन्यापासून पावसाने दगा दिला. त्यामुळे यावर्षी सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. ऑक्टोबरअखेर सरासरी ६६३.२० मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित आहे. मात्र, आजपर्यंत प्रत्यक्षात केवळ ४८७.७० मिलिमीटर पाऊस झाला आहे.

परिणामी तब्बल १७५.५० मिलिमीटर पावसाची तूट निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यात पहिल्या दिवसापासून पावसाची तूट कायम राहिल्याचे चित्र आहे. पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय रब्बी हंगाम धोक्यात आहे.

शिवाय मध्यम व लघू प्रकल्पात अल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे पाणी टंचाईचा भीषण प्रश्न निर्माण होण्याच्या मार्गावर आहे. कारण यावर्षी भरपावसाळ्यात जिल्ह्यातील अनेक गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली असून आजही जिल्ह्यात टँकर सुरू आहेत. पावसाअभावी प्रत्येक तालुक्यातील पाणी पातळी ही खालावली आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करणे अपेक्षित होते.

मात्र, राज्य शासनाने ऑनलाइन अहवालानुसार आधार घेत ट्रिगर-१ आणि ट्रिगर-२ जाहीर केली. यात जिल्ह्यातील जालना, अंबड, बदनापूर, भोकरदन, मंठा या पाच तालुक्यांचा दुष्काळी परिस्थितीमध्ये समावेश झाला आहे. मात्र, जाफराबाद, परतूर आणि घनसावंगी तालुके दुष्काळी परिस्थितीमधून वगळलेे आहेत.

जिल्ह्यातील पाच तालुक्यांचा ऑनलाइन अहवालानुसार दुष्काळी परिस्थितीमध्ये समावेश झाला आहे. ऑनलाइन माहितीनुसार ट्रिगर-१, ट्रिगर-२ लागू झाल्यानंतर या पाचही तालुक्यांचा समावेश झाला आहे.

या तालुक्यांत सुरू असलेले टँकर, कमी झालेली पाणी पातळी, पाणीसाठ्यातील घट आदींचा परिपूर्ण अहवाल राज्य शासनाकडे सादर केला आहे. याशिवाय जाफराबाद, परतूर आणि घनसावंगी या वगळण्यात आलेल्या तालुक्यातील परिस्थितीचा डाटा संकलन करण्याचे काम सुरू आहे.

ऑगस्ट महिन्यातील अपेक्षित पावसा पैकी केवळ ३० टक्के पाऊस झाला आहे. ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत एक मिलिमीटर पाऊस झाला आहे. या सर्व बाबांची माहिती संकलन करण्याचे काम सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT